MP Geeta Kora joins BJP Sarkarnama
देश

Congress News : काँग्रेसनं सोरेन सरकार तारलं अन् खासदाराने सोडचिठ्ठी देत केला भाजपमध्ये प्रवेश

Geeta Kora News : गीता कोडा या काँग्रेसच्या झारखंडमधील एकमेव खासदार असून, माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांच्या पत्नी आहेत.

Rajanand More

Jharkhand Political News : मागील महिन्यात झारखंडमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली. माजी मुख्यमंत्री हेमंत साेरेन यांना ईडीने कथिक भूखंड घोटाळा प्रकरणात अटक केल्यानंतर चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, पण त्यानंतर काही दिवसांत काँग्रेसच्या आमदारांनी दिल्ली गाठत मंत्रिमंडळाबाबत नाराजी व्यक्त केली. मात्र, या घडामोडींपासून पक्षाच्या एकमेव खासदार गीता कोडा लांबच राहिल्या होत्या. त्यानंतर आज त्यांनी थेट काँग्रेसला (Congress News) सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

झारखंडमधील राजकीय (Jharkhand Politics) घडामोडींमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसमधील आघाडी मजबूत असल्याचे स्पष्ट झाले. चंपई सोरेन सरकारच्या बहुमत चाचणीवेळी सर्व आमदारांनी सरकारच्या बाजूने मतदान केले होते. त्यामुळे सरकार मजबूत स्थितीत असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, या आघाडीबाबत गीता कोडा (Geeta Kora) सुरुवातीपासूनच नाराज असल्याचे समोर आले आहे.

कोडा या झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा (Madhu Kora) यांच्या पत्नी आहेत. त्यांनी पाच वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केला होता. झारखंडमधील राजकीय घडामोडींपासून लांबच राहिल्या होत्या. त्यामुळे त्या काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. अखेर आज त्यांनी तडकाफडकी पक्षातून बाहेर पडत भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. झारखंडमधील घडामोडींनंतर काँग्रेससाठी हा पहिला मोठा धक्का मानला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तोंडावर भाजपने काँग्रेसच्या एकमेव खासदाराला फोडत डाव साधला आहे. भाजपकडून 400 हून अधिक जागांचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी विरोधी पक्षांतील नेत्यांना पक्षात घेतले जात आहे. मागील काही महिन्यांत प्रामुख्याने काँग्रेसला अनेक धक्के बसले आहेत. आता कोडामुळे भाजपची ताकद वाढली आहे.

भाजपला (BJP) 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 14 पैकी 11 जागांवर विजय मिळाला होता, तर गीता कोडा यांच्या रूपाने काँग्रेसला केवळ एका जागेवर विजय मिळाला होता. झारखंड मुक्ती मोर्चालाही एकच जागा मिळाली होती. आता कोडाही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने काँग्रेसचा आकडा शून्यावर गेला आहे.

कोडा या पाच वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांना लोकसभेचे तिकीट देण्यात आले होते. पती मधू कोडा हे झारखंडचे पहिलेअसे मुख्यमंत्री होते, जे अपक्ष होते. त्यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर तुरुंगातही जावे लागले. गीता कोडा या पहिल्यांदा 2009 मध्ये निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या. त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्या झारखंडच्या सर्वात कमी वयाच्या आमदार ठरल्या होत्या. त्यांचे वय केवळ 25 वर्षे होते.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT