Karnataka political controversy : कर्नाटक काँग्रेसला सध्या स्टिंग ऑपरेशनने चांगलेच घेरले आहे. माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्याविरोधात कथित लैंगिक गैरवर्तनाचे आरोप असलेला एक व्हिडिओ मागील आठवड्यात सोशल मीडियात व्हायरल झाला होता. त्यानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. या स्टिंग ऑपरेशनशी संबंधित एका नावाने तर काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे.
काँग्रेसच्या नेत्या कृपा अल्वा यांचे नाव समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्यांची चौकशीही केली आहे. त्यानंतर आता प्रदेश काँग्रेसने अल्वा यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. कथित स्टिंग ऑपरेशनमध्ये त्यांचा सहभाग असल्याच्या आरोपांवरून ही कारवाई झाली आहे. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष उपाध्यक्ष एम. नारायणस्वामी यांनी हकालपट्टीचा आदेश काढला आहे.
स्टिंग ऑपरेशनमुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली आहे. या प्रकरणात तुमचे नाव समोर आले आहे. हे वर्तन पक्षविरोधी असल्याने तुमची हकालपट्टी करण्यात येत असल्याचे अल्वा यांनी उद्देशून असलेल्या आदेशात म्हटले आहे. पक्षाने पाठविलेल्या कारणे दाखवा नोटिशीला अल्वा यांनी कोणतेही उत्तर दिले नव्हते. दरम्यान, सिध्दरामय्या यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारती कृपा आल्वा यांचा हात असल्याचा आरोप केला होता.
सिध्दरामय्या यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अल्वा यांचीही चौकशी केली आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीला अटकही करण्यात आली होती. पोलिसांकडून आणखी काही जणांचा शोध घेतला जात आहे. हे कथित स्टिंग ऑपरेशन २०२३ मध्ये चित्रित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सिध्दरामय्या हे विधानसभेतील विरोधी पक्षनेते असतानाच्या २०११ मधील कथित घटनेचा संबंधित या स्टिंग ऑपरेशनशी जोडण्यात आला आहे.
महिलेल्या माध्यमातून सिध्दरामय्या यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आले आहेत. त्यांनी हे आरोप फेटाळून लावले असून व्हिडिओ बनावट असल्याचे म्हटले आहे. आपल्याला ब्लॅकमेलिंग करण्यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
कथित स्टिंग ऑपरेशनच्या व्हिडिओमध्ये कृपा अल्वा या एका व्यक्तीसोबत दिसत असल्याचे दिसते. सिद्धरामय्या यांचे पुत्र आणि मंत्री यतींद्र सिद्धरामय्या यांनी काँग्रेसमधील एका महिला नेत्याला पुत्तूर विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे तिकीट हवे होते. त्यासाठी तिने एका मीडिया संस्थेच्या प्रमुखासोबत मिळून हे स्टिंग ऑपरेशन केले असावे, असा आरोप केला होता.
सिद्धरामय्या यांनी थेट कृपा यांचे नाव पोलिसांना केलेल्या तक्रारीत घेतले होते. कृपा आल्वा या काँग्रेसच्या नेत्या आणि पक्षाच्या प्रवक्त्या होत्या. त्या कर्नाटक बालहक्क संरक्षण आयोगाच्या माजी अध्यक्षही आहेत. प्रदेश काँग्रेसमध्येही त्यांनी विविध पदे भूषविली आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.