National Conference rebellion : सत्ताधारी पक्षाच्या 24 आमदारांचे बंड? मंत्रिमंडळ विस्तारानंतर झालेल्या स्वतंत्र बैठकीत रडारड, मुख्यमंत्री संकटात

Omar Abdullah cabinet expansion, Jammu and Kashmir government, NC MLAs : आमदार कासिर जमशेद लोने यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्‍यांचे सल्लागार नासिर अस्लम वाणी यांना हटविण्याचा ठराव करण्यात आल्याचे समजते.
Jammu and Kashmir Chief Minister Omar Abdullah faces reported dissent within the National Conference after 24 party MLAs held a separate meeting and raised demands for organisational and cabinet-level changes. (File Photo)
Jammu and Kashmir Chief Minister Omar Abdullah faces reported dissent within the National Conference after 24 party MLAs held a separate meeting and raised demands for organisational and cabinet-level changes. (File Photo)Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Jammu and Kashmir politics : इंडिया आघाडीची देशातील मोजक्यात राज्यांत सत्ता आहे. पण तिथेही सर्वकाही आलबेल नाही. काही महिन्यांपूर्वी काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकातील सरकारमध्ये अस्वस्थता होती. आता अशीच स्थिती जम्मू आणि काश्मीरमध्ये निर्माण झाली आहे. काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सच्या २४ आमदारांनी बंडाचे निशाण फडकावले आहे.

राज्यात नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला हे मुख्यमंत्री आहेत. काँग्रेसचा सरकारला पाठिंबा आहे. दोन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढविली होती. दोन दिवसांपूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर अब्दुल्ला यांच्या पक्षाच्या २४ आमदारांची स्वतंत्र बैठक पार पडल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी १८ आमदार प्रत्यक्ष तर सहा आमदार व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठकीला उपस्थित होते. योग्य वागणूक मिळत नसल्याने या बैठकी काही आमदार रडल्याचे वृत्त 'एनडीटीव्ही'ने दिले आहे.

बंडाच्या पवित्र्यात असलेल्या आमदारांनी पक्षांतर्गत सुधारणांची मागणी केल्याचे समोर आले आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या अनुषंगाने निवडीच्या निकषांबाबत पारदर्शकतेवर त्यांनी जोर दिला आहे. तसेच मुख्यमंत्र्‍यांचे सल्लागार आणि काही मंत्र्‍यांना हटविण्याचीही त्यांची मागणी आहे. या आमदारांच्या बंडाने पक्ष नेतृत्वालाच आव्हान देण्यात आले आहे.

Jammu and Kashmir Chief Minister Omar Abdullah faces reported dissent within the National Conference after 24 party MLAs held a separate meeting and raised demands for organisational and cabinet-level changes. (File Photo)
Sarpanch Election news : सरपंचपदाच्या उमेदवाराचा अर्ज बाद होताच संपूर्ण गावाचा बहिष्कार; प्रशासन हादरले, निवडणूकच रद्द

राज्यात नॅशनल कॉन्फरन्सचे ४१ आमदार असून काँग्रेसचे सहा आणि अन्य छोटे पक्ष व अपक्षांचा सरकारला पाठिंबा आहे. एका बंडखोर आमदाराने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही पक्षाच्या विरोधात नाही. पण म्हणून काहीही निर्णय घेतले जाऊ शकत नाहीत. आम्हाला मुख्यमंत्र्‍यांना भेटून मागण्या मांडायच्या आहेत. आमचे ऐकून घेत त्यांनी पक्ष आणि सरकारच्या हितासाठी काही बदल करायला हवेत.

Jammu and Kashmir Chief Minister Omar Abdullah faces reported dissent within the National Conference after 24 party MLAs held a separate meeting and raised demands for organisational and cabinet-level changes. (File Photo)
IAS अधिकाऱ्याची पत्नी निवडणुकीच्या रिंगणात; भाजपकडून पंचायत समितीसाठी उमेदवारी

आमदार कासिर जमशेद लोने यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्‍यांचे सल्लागार नासिर अस्लम वाणी यांना हटविण्याचा ठराव करण्यात आल्याचे समजते. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री सुरेंद्र चौधरी यांच्यासह अन्य काही मंत्र्‍यांना हटविण्याचाही ठराव करण्यात आला आहे. पक्षांतर्गत लोकशाही मजबूत करण्याची आम्ही शपथ घेतल्याचे एका आमदाराने सांगितले. पक्ष एकसंध राहायला हवा, असेच आम्हाला वाटते. पण काही आमदारांना सल्लागारांकडून योग्य वागणुक मिळत नसल्याचे आमदारांचे म्हणणे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.