New Delhi : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी लोकसभेत उत्तर दिलं. मोदींच्या भाषणावेळी विरोधकांनी गदारोळ सुरू केला. तर, मोदींनीही विरोधकांना डिवचल्याचे दिसून आले.
मोदी(PM Modi) म्हणाले, 'विरोधी पक्षांच्या भाषणातून ते विरोधातच राहतील हे लक्षात येतं. असं मोदी म्हणाले. जनता देखील विरोधी पक्षांना विरोधातच बसवतील. विरोधक पुढील निवडणुकीत दर्शक गॅलरीत दिसतील.'
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
याचबरोबर, 'कधीपर्यंत समाजात भेदवभाव निर्माण करणार आहात?. नेते बदलतात पण विरोधकांची टेप एकच. आज विरोधकांची जी अवस्था झाली आहे, याला सर्वस्वी जबाबदार काँग्रेस(Congress) आहे. ते स्वत: दहा वर्षांमध्ये विरोधक म्हणून अपयशी ठरले आणि त्यांनी विरोधी पक्षांमधील अनेकांना यशस्वी होऊ दिले नाही.' असंही मोदी म्हणाले.
याशिवाय 'चांगला विरोधी पक्ष बनण्याची काँग्रेसला संधी होती. देशाला एक चांगल्या विरोधी पक्षाची आवश्यकता आहे. काँग्रेसने स्वत:बरोबरच विरोधकांचंही नुकसान केलं. दहा वर्षांत काँग्रेसला चांगला विरोधी पक्ष बनण्याची संधी होती. काँग्रेसकडून एकच प्रॉडक्ट वारंवार लाँच केलं जातय. काँग्रेस पक्षाला आज कुलप लावण्याची वेळ आली आहे. खर्गे, गुलाम नबी आझाद हे परिवारवादाचे बळी ठरले आहेत.' असं म्हणत मोदींनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं.
'आमच्या मते घराणेशाही म्हणजे एक कुटुंब पक्ष चालवतं त्या कुटुंबातील लोकांनाचा प्राधान्य दिलं जातं. त्या कुटुंबातील सदस्यच पक्षाचे सर्व निर्णय घेतात. जे च लोकशाहीसाठी योग्य नाही. राजकारणात एखाद्या कुटुंबातील दोन-तीन लोक जरी आले तरी काहीच प्रश्न नाही. पण ते त्यांच्या क्षमतेवर, प्रतिभेवर आणि लोकांनी दिलेल्या मतांवर निवडून आलेले हवेत.', लादलेले नकोत असंही मोदींनी यावेळी सांगितलं.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.