Jharkhand Floor Test : झारखंडमध्ये आघाडी भक्कम; चंपई सोरेन यांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव

Champai Soren Government : चंपई सोरेन सरकारच्या बाजूने 47 तर विरोधात 29 आमदारांचे मतदान, बहुमत चाचणीत आघाडी भक्कम...
Champai Soren
Champai SorenSarkarnama
Published on: 
Updated on: 

Jharkhand : मागील काही दिवसांपासून झारखंडमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना आज पूर्णविराम मिळाला. हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. या नव्या सरकारला आज बहुमत चाचणीला सामोरे जावे लागले. त्यामध्ये झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाची आघाडी भक्कम असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Jharkhand Floor Test)

मुख्यमंत्री चंपई सोरेन (Champai Soren) यांच्या सरकारने आज झारखंड विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. यामध्ये सरकारच्या बाजूने 47 मतदान झाले. तर विरोधकांच्या बाजूने 29 मतदान झाले. झारखंड विधानसभेत एकूण 81 सदस्य आहेत. तर आघाडीचे संख्याबळ 48 एवढे आहे. आज जेएमएमचा एक आमदार रुग्णालयात उपचार घेत असल्याने चाचणीला हजर राहू शकले नाहीत.

Champai Soren
Hemant Soren News : ...तर राजकारण सोडेन! जेलमधून थेट विधानसभेत जात सोरेन यांचं ईडीला चॅलेंज

कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीने (ED) मागील आठवड्यात हेमंत सोरेन यांना अटक केली आहे. सध्या ते ईडीच्या कोठडीत आहे. अटकेपुर्वी त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आज या सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावर मतदान झाले. न्यायालयाने दिलेल्या परवानगीनुसार हेमंत सोरेन यांनीही मतदान केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तत्पुर्वी, हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी केलेल्या भाषणात ईडीला चॅलेंज दिले. मला साडे आठ एकर जमीन घोटाळाप्रकरणात मला अटक करण्यात आले आहे. त्यांच्यामध्ये हिंमत असले तर त्यांनी पुरावे दाखवावेत. जमीन माझ्या नावावर नोंदणीकृत असल्याची कागदपत्रे दाखवावीत. हे जर सिध्द झाले तर मी राजकारण सोडेन, असे आव्हान सोरेन यांनी दिले.

Champai Soren
Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या तोंडावर ममतांना धक्का? खासदाराचा सरकारी समित्यांचा राजीनामा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Tribal Education pregnancy test controversy
ED Vs Hemant Soren
Jharkhand JMM leader Sudivya Kumar death
Jharkhand Protest  .jpg
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com