Narendra Modi Sarkarnama
देश

Congress Vs BJP : काँग्रेसच्या नेत्याने उधळली पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमने; म्हणाले, 'ते कधीही भेदभाव...'

Chhattisgarh Political News : राज्य आणि केंद्राच्या एकत्रित कामाने विकासाला वेग

Sunil Balasaheb Dhumal

Raigarh News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रायगडमध्ये छत्तीसगडमधील विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी छत्तीसगडच्या जनतेला सुमारे सहा हजार ४०० कोटी रुपयांची भेट दिली. या सरकारी कार्यक्रमात मोदींसोबत छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री टी. एस.सिंहदेव व्यासपीठावर उपस्थित होते. (Latest Political News)

सिंहदेव यांनी अनेक कामांची उदाहरणे देऊन मोदींच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले. 'केंद्र सरकारने छत्तीसगडमध्ये भेदभाव केला नाही,' असे सिंहदेव म्हणाल्याने राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या आहेत. छत्तीगडमध्ये तीन महिन्यांतच निवडणुका असून काँग्रेसच्या नेत्याने मोदींवर स्तुतीसुमने उधळल्याने चर्चांना उधाण आले आहे.

या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींपूर्वी सिंहदेव यांचे भाषण झाले. यावेळी त्यांनी मोंदीची स्तुती केली. सिंहदेव यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या की त्यावर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी काँग्रेसची असहमती असू शकते. सिंहदेव यांनी केंद्राच्या कामाचे कौतुक केल्याने काँग्रेसची भाजपवर टीका करताना अडचण होण्याची शक्यता असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे. पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना ते म्हणाले की, 'केंद्र सरकारने छत्तीसगडमध्ये भेदभाव केला नाही. याशिवाय भविष्यातही छत्तीसगडला केंद्राकडून असेच सहकार्य मिळत राहील,' अशी अपेक्षाही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. (Maharashtra Political News)

उपमुख्यमंत्री टी. एस. सिंहदेव म्हणाले, 'छत्तीसगडच्या भूमीवर पंतप्रधानांचे स्वागत करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. तुम्ही छत्तीसगडच्या जनतेला भेटवस्तू देण्यासाठी आला आहात, याआधीही तुम्ही अनेक गोष्टी दिल्या आहेत आणि आताही देत ​​आहात. भविष्यातही आमची भेट होत राहील, असा मला विश्वास आहे.'

यानंतर त्यांनी मोंदीचे (Narendra Modi) गोडवे गाताना सिंहदेव म्हणाले, 'केंद्र सरकारकडून कोणताही भेदभाव जाणवला नाही, असा माझा अनुभव आहे. आम्ही काम केले आणि राज्याकडून मागणी केली, तर भागीदार म्हणून केंद्र सरकारनेही मोठ्या मनाने सढळ हाताने मदत केली. आरोग्य, शिक्षण, औद्योगीकरण क्षेत्र असो की रोजगार, सर्व क्षेत्रांमध्ये एकत्रित सहभाग घेऊन आपण सातत्यपूर्ण विकास करत राहू. मला विश्वास आहे येणाऱ्या काळातही या देशाला आणि या राज्याला आमच्या संघराज्य रचनेत मदत करत राहू आणि पुढे नेत राहू.'

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT