Ajit Pawar News : अमित शाहांचा छत्रपती संभाजीनगर दौरा का रद्द झाला ? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली 'ही' माहिती

Amit Shah Chhatrapati Sambhajinagar Visit : '' आम्ही आधीच अमित शाह यांना मराठवाडा मुक्तिसंग्रामाला बोलावलेलं होतं, पण...''
Ajit Pawar News :  Amit Shah
Ajit Pawar News : Amit Shah Sarkarnama

Pune : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगरात १६सप्टेंबर रोजी येणार होते. परंतू, त्याचा हा दौरा आता रद्द झाला आहे. अमित शाह यांच्या आगमनासाठी भाजपने जय्यत तयारी केली होती. जिल्हा आणि राज्याचे प्रशासनही शाह यांच्या दौऱ्यासाठी सज्ज झाले होते.

मात्र, ऐनवेळी हा दौरा रद्द झाल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोड झाला. याचवेळी दौरा रद्द झाल्यानंतर तर्क वितर्कांना उधाण आले होते. आता शाह यांच्या दौरा होण्यामागची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

Ajit Pawar News :  Amit Shah
Ganesh Festival 2023: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोठं गिफ्ट; शिंदे सरकारने घेतला 'हा' निर्णय

उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यांनी यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दौऱ्यावर भाष्य केले. पवार म्हणाले, आम्ही आधीच शाह यांना मराठवाडा मुक्तिसंग्रामाला बोलावलेलं होतं. पण, त्यांच्या कामाच्या व्यापामुळे तो कार्यक्रम थांबवावा लागला. त्यांना इतर कामांना अग्रक्रम द्यावा लागत असल्यामुळे त्यांना येता येणार नाही म्हणून तो कार्यक्रम रद्द करण्यात आला अशी माहिती अजित पवारांनी दिली.

17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आहे. यानिमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येणार होते. त्यांची सभाही होणार होती, पण त्यांचा दौरा रद्द झाला आहे.

तसेच आगामी काळात तीन राज्यातील निवडणुका येऊ घातल्या आहेत. जी 20 च्या निमित्ताने अनेक मान्यवर दिल्लीत आले होते. आता पाच दिवसांचं लोकसभेचं अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. या सगळ्या गोष्टी घडत आहेत त्यामुळे अमित शाह यांना छत्रपती संभाजीनगरला कार्यक्रमासाठी आले नसावे असेही ते म्हणाले.

अजित पवार म्हणाले, मी संभाजीनगरला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) ही पोहोचणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीसाठी लागणारा अधिकारी वर्ग संभाजीनगरला असणार आहे. तिथे मराठवाड्याच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे निर्णय होतील. पावसाने गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आहे. यानिमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येणार होते. त्यांची सभाही होणार होती, पण त्यांचा दौरा रद्द झाला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Ajit Pawar News :  Amit Shah
Amit Shah Tour News : भाजपची सगळी तयारी वाया, अमित शाह यांचा संभाजीनगर दौरा रद्द..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com