New Delhi : भाजपच्या खासदार कंगना रनौत यांनी तीन कृषी कायद्यांविषयी केलेल्या विधानानंतर राजकारण तापले आहे. भाजपने या विधानापासून चार हात लांब असल्याचे दाखवले असून कंगनानेही माफी मागितली आहे. पण विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत जोरदार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे.
काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये ते म्हणतात की, भाजपचे लोक आयडियांची चाचपणी करत असतात. कुणाला तरी सांगतात की, एखादी आयडिया लोकांसमोर ठेवा आणि नंतर त्यावर प्रतिक्रिया पाहा. हेच झाले आहे. त्यांच्या एका खासदाराने काळे कृषी कायदे पुन्हा आणण्याबाबत बोलले आहेत.
मोदीजी, तुम्ही याचे स्पष्टीकरण द्या. तुम्ही याविरोधात आहात की पुन्हा बदमाशी करत आहात? तुम्ही कृषी कायदे परत आणणार की नाही?, अशा कडक शब्दांत राहुल गांधींनी मोदींनी खुलासा करण्याचे आवाहन केले आहे. काळे कायदे परत आणले तर मी तुम्हाला गॅरंटी देतो, इंडिया आघाडी त्याविरोधात उभी राहील, असा इशाराही राहुल यांनी दिला आहे.
शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांची आठवण काढत राहुल म्हणाले, 700 लोक शहीद झाले आहेत. त्यांची आठवण काढत आदर करायचा आहे. मोदींनी दोन मिनिट मौन पाळू दिले नव्हते. आम्ही हे कधीच विसरणार नाही, असे राहुल यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे. त्यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये सरकारचे धोरण कोण ठरवत आहे, भाजपचा एक खासदार की पंतप्रधान मोदी, असा सवालही केला आहे.
प्रामुख्याने हरियाणा आणि पंजाबमधील 700 हून अधिक शेतकरी शहीद होऊनही भाजपवाल्यांचे मन भरले नाही. शेतकऱ्यांविरुध्दचे भाजपचे कोणतेही षडयंत्र इंडिया आघाडी यशस्वी होऊ देणार नाही. शेतकऱ्यांना नुकसान होईल असे कोणतेही पाऊल टाकले तर मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल, असे राहुल यांनी भाजप नेत्यांना ठणकावले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.