Asaduddin Owaisi : तिरुपतीच्या प्रसादात जनावरांची चरबी; असदुद्दीन ओवैसींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Tirupati Laddu Controversary AIMIM : प्रसादाच्या लाडूमध्ये जनावरांची चरबी आणि माशांचे तेल आढळून आल्याचा दावा केला जात आहे.  
Asaduddin Owaisi
Asaduddin OwaisiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूमध्ये जनावरांच्या चरबीचे अंश आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या वाद सुप्रीम कोर्टात पोहचला असून राजकारणही तापले आहे. या प्रकरणावर ‘एआयएमआयएम’चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

सत्ताधारी तेलगू देसम पक्षाने माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींवर निशाणा साधला आहे. त्यानंतर रेड्डींनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू खोटं बोलत असल्याचा आरोप रेड्डींनी केला आहे.

Asaduddin Owaisi
Supreme Court : हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी मागितली माफी; सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी घेतलं फैलावर, काय आहे प्रकरण?

या प्रकरणावर बोलताना ओवैसी म्हणाले, ‘तिरुपतीच्या प्रसादामध्ये जनावरांची चरबी असल्याची माहिती समोर आली आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे. असे व्हायला नको होते. आम्हालाही हे चूक वाटते.’ ओवैसी बुधवारी मुंबई होते. यावेळी त्यांनी मीडियाशी बोलताना या वादावर पहिल्यांदाच भाष्य केले.

भाजपचे खोटा प्रोपेगेंडा

ओवैसी यांनी वक्फ सुधारित विधेयकावरून भाजपवर टीका केली आहे. वक्फचे सदस्य मुस्लिम समाजातील कसे असू शकतात, असा सवाल ओवैसींनी व्यक्त केला. वक्फची संपत्ती ही खासगी आहे. भाजप अफवा पसरवत आहे की, वक्फ एक सरकारी प्रॉपर्टी आहे. वक्फ बोर्डाकडे दहा लाख एकर जमीन असल्याचा खोटा प्रोपेगेंडाही पसरवला जात असल्याची टीका ओवैसींनी केली.

Asaduddin Owaisi
Kangana Ranaut : वादग्रस्त विधानानंतर खासदार कंगनाची माघार; पक्षाने पुन्हा झापल्यानंतर मागितली माफी

हिंदू धर्मामध्ये ज्याप्रकारे प्रॉपर्टी दान केली जाते, त्याचप्रमाणे वक्फमध्ये जमीन दान दिली जाते. पण वक्फ बोर्ड संपवण्यासाठी मोदी सरकार हे विधेयक आणत आहे. केंद्र सरकार म्हणत आहे की, वक्फची जमीन आहे की नाही हे जिल्हाधिकारी ठरवतील. जिल्हाधिकारी तर सरकारी व्यक्त आहे. मग न्याय कसा मिळणार?

आझाद मैदानात आंदोलन

सरकारने आणलेले बिल वक्फ बोर्डाच्या बाजूचे नाही. वक्फला संपवण्यासाठी ते बनवले गेले आहे. आमच्या मागण्या महाराष्ट्र सरकारने मान्य केल्या नाही तर आम्ही आजाद मैदानावर आंदोलन करू, असा इशाराही ओवैसी यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com