Congress Mallikarjun Kharge sarkarnama
देश

Congress : लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस 'अ‍ॅक्शन मोड'वर, पश्चिम बंगाल, ओडिशाचे प्रदेशाध्यक्ष बदलणार?

Loksabha Election Result Congress : पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये 74 लोकसभेच्या जागा आहेत. मात्र, या 74 पैकी केवळ एक जागा काँग्रेसला मिळाली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Congress News : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने तब्बल 100 जागा जिंकल्या.मात्र, पक्षाला अपेक्षित असलेले यश मिळाले नाही. ज्या राज्यांमध्ये पक्षाला यश मिळेल तेथेच पक्षाच्या जागा घटल्या. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. निवडणुकीत फटका बसलेल्या पश्चिम बंगाल, छत्तीसगड व ओडिशा या राज्यांचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये 74 लोकसभेच्या जागा आहेत. मात्र, या 74 पैकी केवळ एक जागा काँग्रेसला मिळाली आहे.

पश्चिम बंगालची जबाबदारी अधीरंजन चौधरी यांच्याकडे होती. मात्र, ते सुद्धा लोकसभा निवडणुकीत विजयी होवू शकले नाहीत. तृणमूल काँग्रेसचे TMC उमेदवार युसूफ पठाण यांनी त्यांचा पराभव केला. चौधरी यांच्याकडे पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद देखील होते. शिवाय लोकसभेत काँग्रेसचे ते गटनेते देखील होते. मात्र, निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला यश मिळाले नाही. फक्त काँग्रेसचा एकच उमेदवार विजयी झाला.

छत्तीसगडमध्ये एकच जागा

छत्तीसगडमध्ये देखील काँग्रेसला Congress पराभवाचा सामना करावा लागला. विधानसभेत काँग्रेसला 35 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस सत्तेतून बाहेर झाली असली तरी लोकसभेला काँग्रेस कमबॅक करेल, अशी शक्यता होती. मात्र, तब्बल 10 जागांवर काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला. तर, केवळ कोरबा या मतदारसंघातून विजय मिळवला. छत्तीसगड काँग्रेसची सुत्रे दीपक बैज यांच्याकडे आहेत. मात्र, येथे काँग्रेस नवीन चेहऱ्याच्या शोधात आहे.

ओडिशा विधानसभेतही यश नाही

ओडिशामध्ये लोकसभेसोबत विधानसभेची निवडणूक झाली. मात्र, लोकसभेत अवघी एक जागा तर विधानसभेत केवळ 15 जागांवर काँग्रेस विजयी झाली. ओडिशाची जबाबदारी सरत पटनाईक यांच्याकडे आहे. मात्र, त्यांच्याकडून ही जबाबदारी काढून घेत ती आदिवासी नेत्याकडेच दिली जाण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT