Raaj kumar Anand : मंत्रिपदाचा राजीनामा देऊन लोकसभा लढवली; विजय तर सोडाच पण आमदारकीही गेली!

Delhi Government MLA AAP : राजकुमार आनंद यांनी मंत्रिपदाची राजीनामा दिल्यानंतर बहुजन समाज पक्षाच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवली होती.
Raaj Kumar Anand
Raaj Kumar AnandSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : दिल्ली सरकारमधील माजी मंत्री राजकुमार आनंद यांना आमदारकीवरही पाणी सोडावे लागले आहे. त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्ष राम निवास योगल यांनीच ही माहिती दिली.

राजकुमार आनंद यांनी एप्रिल महिन्यात दिल्ली सरकारमधील मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तसेच त्यांनी आम आदमी पक्षालाही सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर त्यांनी बहुजन समाज पक्षाच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवली. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

Raaj Kumar Anand
BS Yediyurappa : ते टॉम, डिक किंवा हॅरी नाहीत! येडियुरप्पांच्या अटकेबाबत हायकोर्ट काय म्हणाले?

केजरीवाल सरकारमध्ये राजकुमार आनंद हे समाजकल्याण मंत्री होते. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांनी पक्षातील आणि मंत्रिपदाचाही राजीनामा दिला होता. ज्या उद्देशाने पक्ष बनवला, तो उद्देश पूर्ण होत नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली होती.

लोकसभा निवडणुकीत वेगळ्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी त्यांना नोटीस बजावून उत्तर मागितले होते. नोटीस मिळाल्यानंतर दोन दिवसांपुर्वीच राजकुमार आनंद म्हणाले होते की, मी या प्रकरणात कायदेशीर सल्ला घेत आहे. सल्ला मिळाल्यानंतर मी नोटिशीला उत्तर देईन.

Raaj Kumar Anand
Video Tejashwi Yadav : पिय्यकड पुत्र! तेजस्वी यादव यांचा मद्यधुंद स्थितीतील व्हिडिओ? नेमकं काय घडलं...

विधानसभा अध्यक्षांनी नोटिशीला उत्तर मिळाले नसल्याचे म्हटले आहे. आम्ही त्यांना संधी दिली होती, असे सांगत त्यांनी राजकुमार आनंद यांची आमदारकी रद्द करण्यात आल्याचे सांगितले. पक्षांतर्गत बंदी कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com