Congress Manifesto 2025 for delhi election  Sarkarnama
देश

Congress Manifesto 2025 : मोफत वीज, 500 रुपयांत गॅस अन् बरंच काही, असा आहे दिल्लीकरांसाठीचा 'काँग्रेस'चा जाहीरनामा

Congress Election Manifesto 2025 : काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश, प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष देवेंद्र यादव आणि पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.

Rashmi Mane

Delhi Congress Promises 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक असतानाच काँग्रेसने आज (२९ जानेवारी)ला आपला जाहीरनामा जाहीर केला. या जाहीरनाम्यात काँग्रेसने दिल्लीतील महिलांना दरमहा २५०० रुपये आर्थिक मदत आणि ३०० युनिटपर्यंत मोफत वीज आणि ५०० रुपयांना एलपीजी सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले आहे.

काँग्रेसने दिल्लीत २५ लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा आणि मोफत रेशन किटचेही आश्वासन दिले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश, प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष देवेंद्र यादव आणि पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.

जयराम रमेश यांनी पत्रकारांना सांगितले की, आज सर्व पक्ष 'गॅरंटी' हा शब्द वापरत आहेत, परंतु कर्नाटक निवडणुकीत काँग्रेस पक्षाने हा शब्द पहिल्यांदा वापरला होता. आम्हाला जनतेला हा संदेश द्यायचा होता की काँग्रेस पक्ष जे बोलतो तेच करतो. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना काँग्रेस पक्षाने गॅरंटी स्वरूपात एक कायदा आणला होता, जो मंजूर झाला आणि त्याचे नाव 'राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा' असे होते. गॅरंटी म्हणजे जनतेचा हक्क. जर त्यांना दिलेली आश्वासने पूर्ण झाली नाहीत तर ते कायदेशीर मार्गाचा अवलंब देखील करू शकतात.

ते म्हणाले की या संदर्भात काँग्रेस पक्षाने दिल्लीसाठी ५ गॅरंटी दिल्या आहेत. देवेंद्र यादव म्हणाले की, आम्ही दिल्लीतील लोकांपर्यंत पोहोचलो, त्यांच्या समस्या ऐकल्या आणि मग आम्ही आमचा जाहीरनामा तयार केला आहे. आम्ही आमच्या जाहीरनाम्यात दिल्लीचे मुद्दे आणि शहराच्या गरजांचा समावेश जाहीरनाम्यात केला आहे.

या जाहीरनाम्यात सुशिक्षित बेरोजगार तरुणांना एका वर्षासाठी दरमहा ८,५०० रुपये आर्थिक मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. पक्षाने दिल्लीत १०० 'इंदिरा कॅन्टीन' सुरू करण्याचा प्रस्तावही ठेवला आहे, जिथे पाच रुपयांत जेवण मिळेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT