Congress
Congress Sarkarnama
देश

Congress News : काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याचा पक्षाला रामराम; भाजपत प्रवेश

Ganesh Thombare

Political News :

लोकसभा निवडणूक तोंडावर आली असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. 'इंडिया' आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे, तर भाजपने लोकसभा उमेदवारांची पहिली 195 जणांची यादीदेखील जाहीर केली. सर्वच राजकीय पक्षाचे नेते, मेळावे, बैठका, सभा घेताना पाहायला मिळत आहेत. असे असतानाच काँग्रेसला मात्र धक्क्यावर धक्के बसत आहेत. (Marathi News)

आता काँग्रेसला गुजरातमध्ये सर्वात मोठा धक्का बसला असून, काँग्रेसचे गुजरातचे माजी प्रदेशाध्यक्ष, आमदार अर्जुन मोधवाडिया यांनी आमदारकीचा आणि काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला गुजरातमध्ये मोठं खिंडार पडलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार अर्जुन मोढवाडिया यांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी भाजपत प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या उपस्थितीत अर्जुन मोढवाडिया (Arjun Modhwadia) यांनी भाजपत प्रवेश केला आहे.

काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची सध्या 'भारत जोडो न्याय यात्रा' (Bharat Jodo Nyay Yatra) सुरू आहे. पुढील काही दिवसांत राहुल गांधींची ही यात्रा गुजरातमध्ये दाखल होत आहे, पण 'भारत जोडो न्याय यात्रा' गुजरातमध्ये दाखल होण्यापूर्वीच काँग्रेसला धक्का बसला आहे, तर मागील काही वर्षांत काँग्रेस पक्ष गुजरातमध्ये कमकुवत झाल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.

अर्जुन मोढवाडिया हे पोरबंदर येथील आमदार होते. मात्र, त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्त केला आहे. याबरोबरच काँग्रेस सोडताना त्यांनी मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांना एक पत्र लिहिले आहे.

या पत्रात त्यांनी म्हटलं की, प्रभू श्रीराम हे केवळ हिंदूंसाठी पूजनीय नाही तर ते भारताची आस्था आहेत. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचं निमंत्रण नाकारल्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. काँग्रेस (Congress) पक्ष जनतेच्या भावना समजून घेण्यात अपयशी ठरत असल्याची खदखद त्यांनी या पत्रात व्यक्त केली.

(Edited By-Ganesh Thombare)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT