Lok Sabha Election 2024 : शेट्टींचा स्वबळाचा नारा; 'महाविकास'कडून प्रतीक पाटील यांचे नाव 'फायनल'?

Hatkanangale Constituency : हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. आघाडीकडून शेट्टी की प्रतीक पाटील, याचे गुऱ्हाळ अजूनही सुरूच आहे.
Raju Shetty, Prateek Patil
Raju Shetty, Prateek PatilSarkarnama

Sangli Political News : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात माजी खासदार राजू शेट्टींनी (Raju Shetty) स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे शेट्टी महाविकास आघाडीसोबत येणार नसल्याचे स्पष्ट दिसते. शेट्टींच्या भरवशावर असलेल्या महाविकास आघाडीला आता स्वतंत्र उमेदवार उभा करावा लागेल.

ऐन निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचे चिरंजीव प्रतीक यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. काँग्रेस आणि शिवसेनेकडे ताकदवान उमेदवार नसल्याने प्रतीक हेच मैदानात उतरण्याची चिन्हे आहेत.

हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानीचे माजी खासदार शेट्टी (Raju Shetty) यांना महाविकास आघाडीसोबत घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होते. त्यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जागा जोडण्यास सहमती दर्शवली.

शेट्टींसाठी काँग्रेसचे (Congress) माजी मंत्री सतेज पाटील प्रयत्नशील होते. शेट्टींचा महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) प्रवेशाचा मुहूर्त लवकरच होईल, असे सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात शेट्टी यांच्याकडून आघाडीच्या प्रस्तावाला प्रतिसाद दिलेला नाही.

Raju Shetty, Prateek Patil
Satara India Aghadi : अखेर ठरलं! इंडिया आघाडीची साताऱ्यात बैठक; लोकसभेची रणनीती ठरणार

2014 ची लोकसभा निवडणूक महायुतीकडून लढवली होती, त्यानंतर 2019 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीशी आघाडीकडून लढले होते, परंतु सर्वच पक्षांकडून शेट्टींच्या मागण्यांना महत्त्व दिले नाही, त्यामुळे त्यांनी काडीमोड घेत स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे.

महाविकास आघाडी आणि महायुतीच्या पक्षाने उमेदवारीसाठी मला गळ घातली आहे, पण दोन्ही पक्षांनी शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे. जो-तो आपल्या सोयीचे राजकारण करत आहे, कोण कुठे आहे हे समजत नाही, त्यापेक्षा माझा शेतकरीच बरा आहे.

मी कुणाच्याच पंगतीला बसणार नाही. लोकसभा निवडणूक ही शेतकर्‍यांच्या जिवावर लढणार आहे. कोणत्याच पक्षात पाठिंबा घेणार नसल्याचा निर्णयावर ठाम आहे, असे सांगत लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे शेट्टी यांनी कार्यकर्ता शिबिरात स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीकडून पुन्हा जयंत पाटील यांचे चिरंजीव व राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक यांचे नाव चर्चेत आले आहे. प्रतीक यांच्यासाठी गेली काही महिने हातकणंगले मतदारसंघातून लोकसभेची तयारी सुरू होती.

मात्र, जयंतरावांनी अचानक सांगलीतही चाचणी सुरू असल्याचे स्पष्ट करीत अनेक शंका उपस्थित करायला भाग पाडले होते. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात जयंत पाटील आणि त्यांच्या टीमकडून मतदारसंघात दौरे करून नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात येत आहे.

यापूर्वी हातकणंगलेतील सहा विधानसभा मतदारसंघांतून राष्ट्रवादीकडून गोपनीयरित्या चाचपणी करण्यात आली होती. यामध्ये प्रतीक पाटील (Prateek Patil) नंबर एकला असल्याचे दिसून आले होते. दुसरीकडे हातकणंगले मतदारसंघात जयंत पाटील यांच्या टीमने पुन्हा जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यांचे काही निकटवर्तीय दुसर्‍या फळीतील नेत्यांच्या भेटीगाठी घेत तयारीला लागले आहेत.

हातकणंगले मतदारसंघातील महाविकास आघाडीतील काँग्रेस (Congress), शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाकडे सद्यःस्थितीत जयंत पाटील यांच्याव्यतिरिक्त बडा नेता दिसत नाही. ताकदवान अन्य उमेदवार दिसत नसल्याने जयंतरावांचे पुत्र प्रतीक यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. मात्र, याबाबतचे चित्र येत्या काही दिवसांतच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

R

Raju Shetty, Prateek Patil
Dhairyashil Mane News : मानेंच्या बॅनरवर विकासकामांची माहिती देण्यासाठी 'क्यू आर कोड', पण उघडली भलतीच वेबसाइट

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com