Congress MLA: काँग्रेस आमदाराच्या जवळच्या नातेवाईकाबाबत हा प्रकार घडल्यानं खळबळ उडाली असून यामध्ये राजकीय हस्तक्षेप होता का हे तपासलं जात आहे. पण प्रशासनानं या पुतणीवर कारवाई सुरु केली आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात या विषयाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
कर्नाटकात हा प्रकार घडला असून इथल्या काँग्रेस सरकारला आपल्याच एका आमदाराच्या पुतणीवर कारवाई करण्याची नामुष्की ओढवली. या प्रकरणात आरोप हा आहे की, काँग्रेसच्या आमदाराची पुतणी ही मेडिकल ऑफिसर म्हणून एका हॉस्पिटलमध्ये चुकीच्या पद्धतीनं महिन्याला ७५,००० रुपये पगार घेत होती. कमावर न जाताच तिच्या खात्यावर हे पैसे जमा होत होते. ही बाब उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आणि या प्रकरणाची चौकशी प्रशासनानं सुरु केली आहे.
जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन बाळे यांनी डॉ. अंकिताला सेवामुक्त केलं आहे. त्यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, मी यासंदर्भात DHO रिपोर्ट मागवला आहे. तसंच या प्रकरणात लवकरच कारवाई सुरु करण्यात आली आहे.
बालाकोटचे आमदार उमेश मेती यांची पुतणी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO) डॉ. राजकुमार यारगल यांची मुलगी डॉ. अंकिता राजकुमार यारगल बालाकोट शहरात वाम्बे कॉलनीतील नम्मा क्लिनिकमध्ये एप्रिल २०२५ पासून मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत होती. डॉ. अंकिता यारगल ही जिल्ह्यातील एका खासगी मेडिकल कॉलेजमधून MD कोर्स करण्याबरोबरच सरकारी मेडिकल ऑफिसर म्हणून ७५,००० रुपये मासिक वेतन घेत होती.
स्थानिक सामाजिक कार्यकर्ते राजू नाईक यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती देताना सांगितलं की, डॉ. अंकिता आर यारगल हीनं मेडिकल ऑफिसर या पदावरुन राजीनामा न देताच याच वर्षी मार्च महिन्यात एका खासगी कॉलेजमध्ये पॅथॉलॉजी या विषयात MD साठी प्रवेश घेतला होता. नुकतेच बागलकोट तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सरस्वती मागी यांनी डॉ. अंकिता तैनात असलेल्या नम्मा क्लिनिकला अचानक भेट दिली. पण त्यावेळी डॉ. अंकिता तिथं हजर नव्हती. त्यानंतर जेव्हा डॉ. सरस्वती यांनी तिला कॉल केला तेव्हा तिनं सांगितलं की मी इतर कामानिमित्त शहराबाहेर आले आहे. पण यावेळी दवाखान्यातील रुग्णांनी डॉ. सरस्वती यांच्याकडं तक्रार केली की, ड्युटीवर असलेल्या डॉ. अंकिता या गेल्या तीन महिन्यांपासून रुग्णालयात आलेल्याच नाहीत. तरी देखील त्यांची हजेरी रजिस्टरमध्ये लावली जात होती.
राजू नाईक यांनी सांगितलं की, डॉ. अंकिता कधीही क्लिनिकमध्ये आली नाही पण तिच्या अनुपस्थितीत एक नर्स नियमितपणे तिची हजेरी लावत होती. डॉ. अंकिताच्या नियुक्तीमागे तिचे वडील डॉ. राजकुमार हेच आहेत. अशा प्रकारे नियुक्ती करणं हा केवळ करधारक जनतेच्या पैशांचा अपव्यवच नाही तर बेकायदा देखील आहे. तसंच सरकारच्यावतीनं आरोग्य सुविधांपासून वंचित ठेवण्याचा प्रकारही आहे. कारण मेडिकल ऑफिसर म्हणून डॉ. अंकिता हीच्या बँक खात्यात दरमला ७५,००० रुपये पगार जमा होत होता.
पण अद्याप याप्रकरणावर काँग्रेसचे आमदार उमेश मेती यांनी आपल्या पुतणीच्या कारभारावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसंच डॉ. अंकिता हीनं देखील यावर कुठलंही भाष्य केलेलं नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.