Sanjna Jatav kaptan singh sarkarnama
देश

MP Sanjna Jatav : खासदार पत्नीच्या सुरक्षेसाठी पोलिस हवालदार पती तैनात! काय आहे प्रकरण?

Congress MP Sanjna Jatav Kaptan Singh : संजना या एकमेव खासदार आहेत ज्यांच्या सुरक्षेमध्ये त्यांचे पती तैनात असणार आहेत. पती कप्तान सिंग यांना आपले पीएसओ (सुरक्षा अधिकारी) बनवण्यात यावे, अशी मागणी खासदार संजना जाटव यांनी केली होती.

Roshan More

Sanjna Jatav : लोकसभेतील काँग्रेसच्या खासदार संजना जाटव या सर्वात तरुण खासदार आहेत. वयाच्या 26 व्या वर्षी संजना खासदार झाल्या आहेत. संजना यांचे पती राजस्थान पोलिसमध्ये हवालदार आहेत.

दरम्यान, संजना जाटव पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. कारण खासदार संजना यांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांचे पती कप्तान सिंग यांच्यावर असणार आहे.

संजना या एकमेव खासदार आहेत ज्यांच्या सुरक्षेमध्ये त्यांचे पती तैनात असणार आहेत. पती कप्तान सिंग यांना आपले पीएसओ (सुरक्षा अधिकारी) बनवण्यात यावे, अशी मागणी खासदार संजना जाटव यांनी केली होती. त्यांची ही मागणी मान्य करत कप्तान सिंग यांची संजना यांच्या पीएसओपदी नियुक्त करण्यात आली आहे.

संजना जाटव यांचे वयाच्या 18 व्या वर्षी कॅप्टन सिंगसोबत लग्न झाले. खासदार संजना जाटव यांचे पती कप्तान सिंह हे राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील थानागाजी पोलिस ठाण्यात कॉन्स्टेबल आहेत.

काँग्रेस खासदार संजना जाटव यांच्या राजकारणात प्रवेश करण्यामागे त्यांचे पती कप्तान सिंग आणि सासरे हरभजन सिंग यांचे पाठबळ होते. त्यांनीच संजनाला राजकारणात पुढे जाण्याची प्रेरणा दिली.

निवडणूक जिंकल्यानंतर संजनाने आपल्या यशाचे श्रेय पती कप्तान सिंग आणि सासरे हरभजन सिंग यांना दिले होते. संजना म्हणाल्या होत्या की, 'माझे पती हेच माझे सामर्थ्य असून आता कर्तव्याच्या काळातही ते माझ्यासोबत असतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT