Farooq Abdullah on Indian Army : फारुख अब्दुल्लांचं आणखी एक वादग्रस्त विधान; आता थेट भारतीय सैन्यावरच केलाय गंभीर आरोप!

Farooq Abdullah on Indian Army and Terrorist : जाणू घ्या नेमकं काय म्हणाले आहेत? ; त्यांच्या या वक्तव्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हं असून, सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
Farooq Abdullah on Indian Army
Farooq Abdullah on Indian ArmySarkarnama
Published on
Updated on

Farooq Abdullah Controversial statement News : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ज्यानंतर आता राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. शिवाय, त्यांच्या या वक्तव्यावर सर्वचस्तरातून तीव्र प्रतिक्रियाही उमटत आहेत.

यावेळी अब्दुल्ला यांनी थेट भारतीय लष्कराच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, भारतीय सैन्य शत्रूशी/दहशतवाद्यांशी मिळालेलं आहे, असा गंभीर आरोप केला आहे.

फारूख अब्दुला(Farooq Abdullah) एका बैठकीत माध्यमांसमोर बोलताना म्हणाले, 'सीमेवर एवढ्या मोठ्या संख्येने सैन्य तैनात असूनही दहशतवादी घुसखोरी करण्यात यशस्वी होत आहेत. आपल्या सीमेवर जेवढे सैन्य तैनात आहे, ती नक्कीच जगातील सर्वात मोठी तैनाती असू शकते. एवढ्या मोठ्या सैन्य तैनातीनंतरही दहशतवादी भारतात घुसखोरी करत आहेत.

कारण हे सगळे मिळालेले आहेत. आपल्या विनाशासाठी मिळालेले आहेत.' त्यांचे हे वक्तव्य प्रसारमाध्यमांवर आल्यानंतर ते प्रचंड व्हायरल होत आहे आणि यावर संतापही व्यक्त होत आहे.

Farooq Abdullah on Indian Army
Farooq Abdullah on Terror Attack : '...तोपर्यंत इथे दहशतवाद्यांचे हल्ले बंद होणार नाहीत' ; फारुख अब्दुल्लाचं विधान!

विशेष म्हणजे याआधीही फारुख अब्दुल्ला यांनी अशाचप्रकारे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, ज्यावरून राजकीय वातावरण तापलं होतं. या आधी फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले होते की, कोणताही काश्मिरी पंडीत पुन्हा कधीच काश्मीरमध्ये परत येऊ शकणार नाही. 32 वर्षांत काश्मीरमधील परिस्थिती बरीच बदलली आहे. काश्मिरी पंडितांना परत आणण्याचे वचन देणारे राज्यपालही आता जिवंत नाहीत. काश्मीरमध्ये शांतता गरजेची आहे, याशिवाय काश्मिरी पंडीत परत येऊ शकणार नाहीत.

Farooq Abdullah on Indian Army
Farooq Abdullah News : पाकिस्तानने बांगड्या घातलेल्या नाहीत! फारुख अब्दुल्लांच्या विधानावर भाजप भडकले

याशिवाय, फारूख अब्दुल्ला यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह(Rajnath Singh) यांच्या वक्तव्यावरही वादग्रस्त विधान केलं होतं. राजनाथ सिंह यांनी पीओके वर भारत कधी आपला हक्क सोडणार नाही, असं म्हटलं होतं. ज्यावर प्रतिक्रिया देताना अब्दुल्ला यांनी म्हटले होते की, 'पाकिस्तानाने काही बांगड्या घातलेल्या नाहीत. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, हे भारताने कधीही विसरू नये.' तसेच त्यांनी कलम 370 हटवण्यावरूनही केंद्रावर निशाणा साधला होता.

डीपीए प्रवक्त अश्विनी हांडा यांनी फारुख अब्दुल्ला यांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी म्हटले की, ते वरिष्ठ नेते आहेत आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे की त्यांनी भारतीय लष्काराच्या शौऱ्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. हा वीर जवानांच्या हौतात्मावर उपस्थित झालेला प्रश्न आहे, जे देशासाठी आपले सर्वोच्च बलिदान देत आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com