Prakash Ambedkar News :सर्वोच्च न्यायालयाने एससी आरक्षणात उप वर्गीकरण करण्याचा निर्णय घेतला. तसेच एससी आरक्षणात क्रिमीलेयर लागू करण्याच्या सूचना केल्या. न्यायालयाच्या या आदेशानंतर भाजपच्या एससी, एसटी खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीवरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
'खासदारांसोबत फोटो काढून आम्हाला वेड्यात काढत आहेत. हे फोटोशूट सुप्रीम कोर्टाने एससी यादीत उपवर्गीकरण करण्याचा राज्य सरकारांचा निर्णय रद्द करेल का? तर नाही. पंतप्रधान मोदी तुमच्या आश्वासनाला काही अर्थ नाही.', असे ट्विट प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
1 ऑगस्ट 2024 चा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करण्यासाठी घटनादुरुस्ती आणा. आरक्षण धोक्यात आले असल्याचे आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. आंबेडकर यांनी न्यायालयाचा निकाल आल्यानंतर अनुसूचित जातींमध्ये वर्गीकरण करण्यास विरोध दर्शवला होता.
'भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या वतीने ॲटर्नी जनरल यांनी सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाच्या बाबतीत अनुसूचित जाती आणि जमातींमध्ये क्रिमीलेयर आणि त्यांचे उपवर्गीकरण लागू करण्याच्या बाजूने युक्तिवाद केला होता.', असे सांगत भाजप उपवर्गीकरणाच्या बाजुने असल्याचा दावा आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे.
न्यायालयाने एससी-एसटीच्या आरक्षणाबाबत क्रिमिलेअरचा मुद्दा उपस्थित केले होता. त्याबाबत खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. न्यायालयाच्या या निकालाची अंमलबजावणी होऊ नये, अशी आमची भावना असल्याचे भाजप खासदार फग्गनसिंह कुलस्ते यांनी मांडली. इतर खासदारांची देखील तसेच मत आहे, असे मोदींना सांगण्यात आले. त्यावेळी आम्हाला काळजी करू नका. एससी-एसटींसाठी क्रिमिलेअर लागू होणार नाही, असे स्पष्टच मोदींनी सांगितल्या भाजप खासदार म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.