Mallikarjun Kharge, Amit Shah Sarkarnama
देश

Mallikarjun Kharge News : गंगेत डुबकीवरून खर्गेंचा शहांवर निशाणा, नंतर स्टेजवरच हात जोडून मागितली माफी...

Amit Shah in Prayagraj Mahakumbha Mela : मोदींचे जे बोलतात, त्यावर जाऊ नका. गंगेत डुबकी घेऊन गरिबी दूर होते का? तुमच्या पोटाला अन्न मिळेल का?, असे सवाल मल्लिकार्जून खर्गे यांनी उपस्थित केले.

Rajanand More

Congress Politics : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जोरदार निशाणा साधला. शहा यांनी प्रयागराजमध्ये गंगेत स्नान केले. त्यावरून खर्गे यांनी टीका करताना शंभर जन्म घेतले तरी स्वर्गात स्थान मिळणार नाही, असे विधान केले. तसेच गंगेत डुबकी मारून गरिबी हटेल का, असा सवालही केला.

मध्य प्रदेशातील महू येथे काँग्रेसच्या जय बापू, जय भीम, जय संविधान या रॅलीत खर्गे बोलत होते. खर्गे यांच्या या विधानावर आता नवा वाद निर्माण झाला आहे. भाषणादरम्यान बोलताना खर्गे म्हणाले, मोदीजी तर खूप गप्पा मारतात. हातात संविधान घेऊन नमस्कार करतात. पण सगळे काम संविधानाविरोधात करत आहेत. शिक्षणात घोटाळा, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही.

आरएसएसच्या कार्यकर्त्यांना शिक्षणसंस्थांमध्ये टाकत आहेत. जे लोक मनुवादी आहेत, त्यांना तिथे जागा मिळत आहे. आज आम्ही मेरिटवर काम करत असल्याचे तेच बोलत आहेत. मनुवादाला संपवून टाकायचे आहे. मनुवादावर चालत राहिलो तर गरिबांचा सत्यानाश होईल. तुम्हाला एक होऊन पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधींनी गरिबांसाठी जे काम केले, ते काम तुम्हाला पुढे न्यायचे आहे, असे खर्गे म्हणाले.

मोदींचे जे बोलतात, त्यावर जाऊ नका. गंगेत डुबकी घेऊन गरिबी दूर होते का? तुमच्या पोटाला अन्न मिळेल का?, असे सवाल खर्गे यांनी उपस्थित केले. मला कुणाच्या आस्थेला ठेच पोहचवायची नाही. कुणाला वाईट वाटले असेल तर मी माफी मागतो. पण तुम्ही सांगा, मुलं उपाशी मरत असेल, शाळेत जाऊ शकत नसेल, मजुरांना मिळत नाही, असेही खर्गे यांनी यावेळी नमूद केले.

हे सगळं होत असताना हे लोक हजारो रुपये खर्च करून कॉम्पिटिशन करत डुबकी मारत आहेत. जोपर्यंत टीव्हीवर चांगले दिसत नाही, तोवर डुबकी मारत आहेत. अशा लोकांमुळे देशाचे भले होणार नाही. आमची देवावर आस्था आहे. तुम्ही रोज पुजा करतात. घरात महिला-पुरूष पूजा करून बाहेर पडतात. आमचा त्यावर काहीच आक्षेप नाही. आक्षेप आहे तो, गरिबांचे धर्माच्या नावावर जे शोषण होत आहे, त्याविरोधात आपल्याला लढायचे आहे, असेही खर्गेंनी स्पष्ट केले.

मोदी-शाह यांनी एकत्रितपणे खूप पापं केली आहेत. त्यामुळे पुढील 100 जन्म घेतले ते स्वर्गात जाणार नाही. लोकांकडून मिळणाऱ्या शापामुळे नरकात जागा जातील, असा जोरदार हल्ला खर्गेंनी चढवला. खर्गे यांच्या या विधानानंतर भाजप नेत्यांनी पलटवार केला. खासदार संबित पात्रा म्हणाले, सनातन आस्थेचे प्रतिक असलेल्या महाकुंभची काँग्रेस आणि पक्षाचे अध्यक्ष खिल्ली उडवत आहेत. त्यांचे हे विधान अत्यंत लाजिरवाणे आहे, अशी टीका करताना पात्रा यांनी त्यांना हिंदू विरोधी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT