Firing on MLA Office : आजी-माजी आमदारांमध्येच गँगवॉर; कार्यालयावर धडाधड झाडल्या गोळ्या

Uttarakhand BJP news Kunwar Pranav Singh Champion shooting incident Umesh Kumar MLA office attack : खानपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार उमेश कुमार आणि माजी आमदार प्रणव सिंह चॅम्पियन यांच्यामध्ये वाद सुरू आहे.
Firing on MLA Office
Firing on MLA OfficeSarkarnama
Published on
Updated on

Uttarakhand News : उत्तराखंड राज्यातील हरिद्वार जिल्ह्यात आजी-माजी आमदारांमध्ये गँगवॉर पेटल्याचे धक्कादायक वृत्त आहे. या गँगवॉरचे व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल होत आहे. भाजपच्या माजी आमदाराने विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर दिवसाढवळ्या धडाधड गोळ्या झाडत दहशत निर्माण केली. निवडणुकीतील पराभवापासून दोन्ही नेत्यांमध्ये वाद सुरू झाला आहे.

खानपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार उमेश कुमार आणि माजी आमदार प्रणव सिंह चॅम्पियन यांच्यामध्ये वाद सुरू आहे. चॅम्पियन यांनी उमेश कुमार यांच्या घरावर गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी त्यांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर उमेश कुमार यांना पोलिसांनी अटक केली आहे.

Firing on MLA Office
Waqf Bill Latest Bill : मोठी बातमी : वक्फ विधेयक मंजूर, JPC ने विरोधकांच्या सर्व शिफारशी फेटाळल्या

चॅम्पियन यांच्या पत्नी कुंवरानी देवयानी यांनी कुमार यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. कुंवरानी देवयानी यांनी आरोप केले आहेत की, शनिवारी (ता. २५ जानेवारी) रात्री नऊ वाजता उमेश कुमार आपल्या घरी आणि कार्यालयात आले होते. तिथे त्यांनी घरात घुसून दहशत पसरण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार उमेश कुमार यांना पोलिसांनी अटक केली आहे.

प्रणव सिंह चॅम्पियन यांनीही रविवारी समर्थकांसह उमेश कुमार यांचे कार्यालय गाठले. तिथे कुमार यांच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांनी कार्यालयावर गोळ्या झाडल्या. याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर चॅम्पियन यांना अटक करण्यात आले.

Firing on MLA Office
AAP Manifesto 2025 : दिल्लीकरांसाठी ‘आप’चा जाहीरनामा प्रसिद्ध; या आहेत अरविंद केजरीवालांच्या 15 मोठ्या घोषणा

निवडणुकीतील पराभवावरून वाद

कुमार आणि चॅम्पियन यांच्यातील वाद 2022 पासूनच आहे. यावर्षी उत्तराखंडमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने चॅम्पियन यांच्या पत्नीला खानपूर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार म्हणून उमेश कुमार यांनी निवडणूक लढवली. या निवडणुकीत उमेश कुमार यांचा विजय झाला.

उमेश कुमार यांचा विजयच दोघांमधील शत्रुत्व वाढण्यास कारणीभूत ठरले. चॅम्पियन हे माजी आमदार असल्याने पत्नीचा पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. तेव्हापासून दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर कुरघोडीचा प्रयत्न केला जातो. शनिवारी आणि रविवारी दोन्ही नेत्यांमध्ये जणू गँगवॉर भडकल्याची चित्र नागरिकांना पाहायला मिळाले.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com