Mnai Shankar Aiyar
Mani Shankar Aiyar Sarkarnama
देश

Congress Politics : Who is Mani Shankar Aiyar? काँग्रेसनंच काढली अय्यर यांची लायकी

Rajanand More

China War Issue : काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर (Mani Shankar Aiyar) यांच्या वादग्रस्त विधानांनी काँग्रेसला (Congress Politics) जेरीस आणले आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांच्याकडून वाद ओढवून घेतला जात असल्याने भाजपकडून काँग्रेसवर टीकास्त्र सोडले जात आहे. यापुर्वीही अनेकदा अय्यर यांच्या विधानांनी काँग्रेसची कोंडी केली. पक्षातील नेत्यांकडून ही अय्यर यांची वैयक्तिक विधाने असल्याचे सांगत नेहमी अंग काढून घेतले जाते. बुधवारी तर काँग्रेस नेत्यांनी अय्यर यांची थेट लायकीच काढली.

अय्यर यांनी चीन युध्दाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एका कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी चीन युध्दाचा उल्लेख कथित युध्द असा केल्याने वाद निर्माण झाला आहे. हे वक्तव्य समोर आल्यानंतर भाजपने (BJP) त्याचा चांगलाच समाचार घेतला. तसेच काँग्रेसनेही या विधानापासून आपल्याला दूर सारलं आहे. (Latest Political News)

अय्यर यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) म्हणाले, मणिशंकर अय्यर कोण आहेत? ते कसलेही पदाधिकारी नाही. ते माजी खासदार, माजी मंत्री आहेत. ते जे बोलतात ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. आमचे त्याच्याशी काही देणेघणे नाही. (Latest Marathi News)

मीडिया, भाजपची ट्रोल आर्मी सोशल मीडियात त्यांची विधाने व्हायरल करतात. आज त्याचा काँग्रेसशी काही संबंध नाही. ते काँग्रेस पक्षात आहेत, पण ते खासदारही नाहीत, केवळ माजी खासदार आहेत, असे सांगत जयराम रमेश यांनी अय्यर यांच्या काँग्रेसमधील स्थानाबाबत स्पष्ट केले आहे.

अय्यर यांनी मागितली माफी

दरम्यान, अय्यर यांनी आपल्या विधानाबाबत माफी मागितली आहे. चुकून कथित हा शब्द वापरला गेल्याचे त्यांनी म्हटले आहे. यानंतर जयराम रमेश यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले होते की, अय्यर यांनी चुकून कथित आक्रमण हा श्बद वापरला होता. त्यांनी याबाबत माफी मागितली आहे. काँग्रेस पक्षाचा त्याच्याशी काही संबंध नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT