India Alliance : काँग्रेससोबत ना लव्ह मॅरेज, ना अरेंज मॅरेज! निकालाआधीच केजरीवालांनी वाढवलं ‘इंडिया’चं टेन्शन

Arvind Kejriwal News : लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी एक जूनला इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. अरविंद केजरीवाल या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी मात्र त्यांना जेलमध्ये जावे लागणार आहे.
Rahul Gandhi, Arvind Kejriwal
Rahul Gandhi, Arvind KejriwalSarkarnama

Lok Sabha Election 2024 : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना दोन जूनला पुन्हा जेलमध्ये जावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याआधी ते एक जूनला इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याआधी काँग्रेस आणि इंडिया आघाडीविषयी (India Alliance) केजरीवाल यांनी एका मुलाखतीत मोठं विधान केलं आहे. 

केजरीवाल यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये इंडिया आघाडीमध्ये पुढेही कायम राहणार की नाही, याबाबत भाष्य केले आहे. ते म्हणाले, आम्ही विवाह केलेला नाही. ना अरेंज मॅरेज ना लव्ह मॅरेज. आम्ही सर्वजण देश वाचवण्यासाठी चार जूनपर्यंत लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढण्यासाठी एकत्र आलो आहोत. आमचे लक्ष्य सध्यातरी भाजपला (BJP) हरवणे हे आहे. (Latest Political News)

Rahul Gandhi, Arvind Kejriwal
Karan Bhushan Singh : खासदार पुत्र व भाजप उमेदवाराच्या ताफ्यातील फॉर्च्यूनरने दोन तरूणांना चिरडलं

दिल्ली-चंदीगढमध्ये काँग्रेससोबत (Congress) आणि पंजाबमध्ये विरोधात निवडणूक लढण्याबाबत केजरीवाल म्हणाले, यावेळी देशाला वाचवणे आवश्यक आहे. भाजपला हरवण्यासाठी जिथे-जिथे शक्य आहे, तिथे आम्ही एकत्र आलो. भाजपविरोधात एकच उमेदवार असावा, हा उद्देश होता. पंजाबमध्ये भाजपचे अस्तित्वच नाही. त्यामुळे इथे आम्ही विरोधात लढत आहोत. पुढे काय करायचे, हे आम्ही चार जूननंतर ठरवू, असेही केजरीवाल यांनी स्पष्ट केले. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जेलमध्ये गेल्यामुळे विरोधकांकडून केजरीवालांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यावर बोलताना केजरीवालांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच नसल्याचे सांगितले. मी पुन्हा जेलमध्ये जाण्याचा मुद्दा नाही. या देशाचे भविष्य पणाला लागले आहे. जेव्हा वाटेल तेव्हा त्यांनी मला तुरुंगात टाकावे. मी घाबरणार नाही. भाजपला वाटते म्हणून मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही, असे केजरीवालांनी स्पष्ट केले. (Arvind Kejriwal Latest News)

आप खासदार स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणावर केजरीवालांनी बोलण्यास नकार दिला. हे प्रकरण सध्या कोर्टात आहे. एक बाजू मालीवाल यांची आहे, एक बाजू विभव यांची. कोर्टाने न्याय करायचा आहे. आतापर्यंत विभववर केवळ आरोप आहेत. ते सिध्द झालेले नाहीत.

दरम्यान, केजरीवाल हे सध्या अंतरिम जामीनावर जेलबाहेर आहेत. लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी त्यांना सुप्रीम कोर्टाने एक जूनपर्यंत जामीन दिला आहे. जामीनाची मुदत सात दिवसांनी वाढवण्यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका केली होती. पण याचिका दाखल करून घेण्यास कोर्टाच्या रजिस्ट्रार कार्यालयाने नकार दिल्याने त्यांना दोन जूनला सरेंडर करावे लागणार आहे.

Rahul Gandhi, Arvind Kejriwal
Political Tourism : 300 मोठी हॉटेल, 1200 लक्झरी वाहने बुक..! काशीमध्ये बडे नेते, मंत्र्यांचे ‘पॉलिटिकल टुरिझम’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com