Odisha Politics : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान एक जूनला होणार आहे. ओडिशामध्ये काही जागांसाठी मतदान होणार असून त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) मुख्यमंत्री नवीन पटनायक (Naveen Patnaik) यांच्या प्रकृतीविषयी मोठं भाष्य केलं आहे. पटनायक यांची प्रकृती मागील वर्षभरापासून सातत्याने खालावत चालली आहे. त्यामागे काही षडयंत्र असावं, अशी भीती लोकांकडून व्यक्त केली जात असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींनी ओडिशातील एका प्रचारसभेत (Lok Sabha Election 2024) बुधवारी ही भीती व्यक्त केली आहे. ते म्हणाले, आज मी एका महत्वाच्या मुद्यावर बोलणार आहे. नवीनबाबूंची तब्बेत मागील वर्षभरापासून खालावत आहे. त्यांचे शुभचिंतक चिंतेत आहेत. वर्षभरात तब्बेत एवढी कशी खालावली? त्यांची तब्बेत खालावण्यामागे काही षडयंत्र आहे का?, अशी भीती मोदींनी व्यक्त केली. (Naveen Patnaik Health News)
ओडिशातील (Odisha Assembly Election) लोकांना हे जाणून घेण्याचा अधिकार आहे. यामध्ये एखाद्या लॉबीचा तर हात नाही ना?, जे पडद्यामागून नवीनबाबूंच्या नावावर ओडिशातील सत्ता उपभोगत आहेत, अशी शंकाही मोदींनी व्यक्त केली. या रहस्यावरचा पडदा उठायला हवा. त्यासाठी 10 जूननंतर राज्यात भाजपची (BJP) सत्ता आल्यानंतर एक विशेष समिती नेमून त्याची चौकशी केली जाईल, असे मोदींनी जाहीर केले. (Odisha Political Update)
दरम्यान, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. यामध्ये पटनायक एका प्रचारसभेत भाषण करताना त्यांचा हात थरथरत असल्याचा दिसतो. बिजू जनता दलाचे नेते व्ही. के. पांडियन हे त्यांच्याशेजारी हातात माईक धरून उभे आहेत. थरथरणारा हात नागरिकांना दिसू नये म्हणून पांडियन यांच्याकडून हात लपवण्याचा प्रयत्न केल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते.
सोशल मीडियात व्हायरल व्हिडिओमुळे पटनायक यांच्या प्रकृतीबाबत चर्चांना उधाण आले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही हा व्हिडिओ ट्विट केला आहे. पटनायक यांचे वय 77 वर्षे आहे. मागील काही वर्षांपासून त्यांचे हात थरथरत आहेत. पण पांडियन यांनी थरथरणारा हात लपवण्याचा प्रयत्न केल्यानंतर विरोधकांना हा मुद्दा उचलून धरला आहे. मोदींच्या आजच्या घोषणेमुळे त्यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.