Priyank Kharge Sarkarnama
देश

Priyank Kharge RSS : RSSवर बंदी कशी घालणार? ते नोंदणीकृतच नाहीत; प्रियांक खर्गेंचा संघाला जिव्हारी लागेल असा घाव

Priyank Kharge questions RSS over registration and freedom struggle : RSSच्या नोंदणीवरून सवाल करत प्रियांक खर्गेंनी स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, शहीद आणि जातीय दंगलींच्या मुद्द्यावरून संघावर टीका केली.

Pradeep Pendhare

BJP and Congress : काँग्रेस नेते कर्नाटकमधील मंत्री प्रियांक खर्गे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गेल्या काही दिवसापासून तीव्र संघर्ष सुरू आहे. देशात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह असतानाच, प्रियांक खर्गे यांनी संघावर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे.

संघाची नोंदणी, स्वातंत्र्य संग्राम शहीद, जातीय दंगली आदी मुद्यांवरून, प्रियांक खर्गे यांनी संघाला सुनावले आहे.

RSSवर बंदी घालता येणार नाही, मोहन भागवत यांनी जे म्हटले आहे, हा धागा पकडत प्रियांक खर्गे यांनी, ते खरे आहे की, त्यांच्यावर बंदी घालता येणार नाही. कारण हे नोंदणीकृतच नाही. एखाद्या संघटनेवर बंदी घालण्यासाठी ती आधी नोंदणीकृत असणे आवश्यक नाही का? तुम्ही नोंदणीकृतही नाही, मग तुमचे उपक्रम कसे चालवता? असा प्रश्न केला.

कर्नाटकचे काँग्रेसचे (Congress) मंत्री प्रियांक खर्गे यांनी, “माझा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) एकच प्रश्न आहे. तुम्ही स्वातंत्र्यलढ्यात नेमका कोणता सहभाग घेतला, कोणत्या लढ्यात भाग घेतला, हे सांगा. विविध पक्षांतील असंख्य लोक या लढ्यात सहभागी झाले आणि त्यांनी संघर्ष केला. त्यावेळी तुम्ही कुठे होता? असाप्ऱश्न केला.

मी काँग्रेस पक्षाच्या शहीद झालेल्या 500 सदस्यांची यादी देऊ शकतो. त्यांनी फक्त 50 जणांची यादी द्यावी. फाळणीनंतर देशात अनेक जातीय-धार्मिक दंगली झाल्या. त्यापैकी कोणत्या दंगलीत तुम्ही लोकांचे संरक्षण केले? उलट, तुमच्यामुळेच जातीय दंगली घडल्या, असा गंभीर आरोप प्रियांक खर्गे यांनी संघावर केला.

प्रियांक खर्गे यांच्या प्रश्नांच्या सरबती

कर्नाटक सरकारी जागा आणि सार्वजनिक मालमत्तेच्या वापराचे नियमन 2026च्या विधेयकावर मंत्री प्रियांक खर्गे यांनी, “भाजपचे लोक सध्या या विधेयकाला इतके का घाबरत आहेत? त्यांनी हे विधेयक वाचले आहे का? या विधेयकात आम्ही केवळ सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार तरतुदी लागू करत आहोत. या विधेयकात कुठे कोणत्या संघटनेचे नाव आहे का? कोणत्या असोसिएशनचे नाव आहे का? कोणत्या संस्थेचे नाव आहे का? कोणत्या राजकीय पक्षाचे नाव आहे का? अशा प्रश्नांच्या सरबती प्रियांक खर्गे यांनी केल्या.

‘प्रियांक-फोबिया’

न्यायालयांनी दिलेले आदेश कायद्याच्या माध्यमातून लागू करत असू, तर भाजपची नेमकी अडचण काय आहे? मी या राज्याचा गृहविभाग सांभाळतो आणि नियमन करणे ही माझी जबाबदारी आहे. अनेकदा तुमच्या घरासमोर एखादा मोठा कार्यक्रम किंवा मिरवणूक सुरू असेल, तर तुम्हीच आम्हाला फोन करून विचारता ना की, याला परवानगी कोणी दिली आणि हे काय सुरू आहे? ती सार्वजनिक जागा आहे. तुम्हाला जे काही करायचे असेल ते तुमच्या घराच्या आवारात करा, कार्यालयाच्या आवारात करा; त्यावर कोणाचाही आक्षेप नाही. या विधेयकात आम्ही कुठे म्हटले आहे की यावर बंदी घालण्यात येत आहे? त्यांना ‘प्रियांक-फोबिया’ आहे, मला नाही. मी त्यांना घाबरलो आहे, असे तुम्हाला दिसते का? असा प्रतिप्रश्न प्रियांक खर्गे यांनी उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT