RSS Route March Permission : RSS पथसंचलनासाठी पूर्वपरवानगी बंधनकारक; मंत्री प्रियांक खर्गे यांची भूमिका, मोहन भागवतांना पत्र

Mohan Bhagwat receives letter on RSS procession : आवश्यक कागदपत्रे सादर होईपर्यंत परवानगीशिवाय पथसंचलन नाही, असे सांगून टीकेला कामातून उत्तर देणार असल्याचेही प्रियांक खर्गे यांचे विधान.
Priyank Kharge latest statement on RSS
Priyank Kharge latest statement on RSSSarkarnama
Published on
Updated on

Priyank Kharge Vs RSS Controversy : राज्यातील काँग्रेस सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांच्यातील वादाला नवे वळण मिळाले आहे. आरएसएसवर सातत्याने टीका करणारे कर्नाटक राज्याचे गृहमंत्री मंत्री प्रियांक खर्गे यांनी संघाच्या पथसंचलनाबाबत कठोर भूमिका मांडली आहे. राज्यात आरएसएसला पथसंचलन काढायचे असल्यास संबंधित प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

गुलबर्गा प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खर्गे म्हणाले, मी मंत्री असेपर्यंत आरएसएसच्या (RSS) कोणत्याही पथसंचलनासाठी प्रशासनाची पूर्वपरवानगी आवश्यक असेल. नियम सर्वांसाठी समान आहेत आणि त्यांचे पालन झाले पाहिजे.

प्रियांक खर्गे यांनी यावेळी सांगितले की, त्यांनी आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांना या संदर्भात पत्र लिहिले आहे. संघटना शंभर वर्षांची असल्याचा दावा केला जातो. मग तिची अधिकृत कागदपत्रे आणि आवश्यक नोंदणीची माहिती सादर करावी. ती उपलब्ध होईपर्यंत परवानगीशिवाय कोणतेही पथसंचलन होऊ दिले जाणार नाही, असे त्यांनी म्हटले.

Priyank Kharge latest statement on RSS
Raj Thackeray Slams Vishwas Nangare Patil : ‘खाकीमध्ये संघाची निष्ठा?’ नांगरे पाटील राज ठाकरेंच्या लक्ष्यावर! रझा अकादमीविरोधातील मोर्चाचा मुद्दाही उकरला

या विषयावर भूमिका मांडल्यानंतर भाजप आणि आरएसएस समर्थकांकडून वैयक्तिक पातळीवर टीका होत असल्याचा आरोपही खर्गे यांनी केला. माझे लग्न, माझी मुले आणि माझ्या रंगावरून टीका केली जात आहे. मात्र, अशा टीकेला मी घाबरणार नाही. माझ्या कामातूनच उत्तर देईन, असे त्यांनी सांगितले.

Priyank Kharge latest statement on RSS
RSS registration issue : ‘RSS’च्या कायदेशीर नोंदणीसाठी कायदा आणणार; प्रियांक खर्गेंनी ठोकला शड्डू!

प्रियांक खर्गे यांची भागवतांकडे संघाच्या नोंदणीकडे मागणी

दरम्यान, मंत्री प्रियांक खर्गे आणि आरएसएस यांच्यात गेल्या काही दिवसांत टोकाचा वाद निर्माण झाले आहेत. मंत्री खर्गे यांच्याकडून गेल्या दिवसांपासून आरएसएसकडे नोंदणीचे कागदपत्रांची मागणी लावून धरली. मंत्री खर्गे यांनी पत्र लिहून संघ कोणत्या कायद्यानुसार चालतो, उत्पन्न-खर्च आणि देणग्यांचा तपशील सार्वजनिक करण्याची मागणी केली.

मोहन भागवत यांचे खर्गेंना प्रत्युत्तर

त्यावर 'संघाला नोंदणीची कोणतीही गरज नाही' असे स्पष्ट करत मोहन भागवत यांनी हे आरोप फेटाळले आणि खर्गे यांचे प्रश्न राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा केला. यावेळी खर्गे आणि आरएसएस यांच्यात तीव्र वाद निर्माण झाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

RSS Meeting Controversy; M. M. Kalburgi, Gauri Lankesh
RSS Meeting
Court Slams Priyank Kharge
Mohan Bhagwat
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com