Election Commission legal provision : काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मत चोरीच्या आरोपावर भाजप आणि निवडणूक आयोग पुरता घायाळ झालेला दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भाजप राहुल गांधींच्या आरोपावर लढाई लढणार असेच सध्या तरी असेच चित्र दिसत आहे.
निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपाची चौकशीसाठी प्रतिज्ञापत्र मागितले आहे. परंतु असे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाला घेता येते का? याविषयी कायद्यात काय तरतूद आहे? यावर आता चर्चा सुरू झाल्या आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरूवारी "मत चोरी"चा गंभीर आरोप केला. या आरोपानंतर देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. भाजपने (BJP) राहुल गांधींच्या या आरोपाला प्रत्युत्तर देत आहे. याशिवाय निवडणूक आयोगाने देखील आरोपाच्या चौकशीसाठी राहुल गांधींकडे प्रतिज्ञापत्राची मागणी केली आहे.
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या आरोपानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने कर्नाटक, महाराष्ट्र आणि हरियाणा या तीन राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी (सीईओ) गांधींकडून त्यांच्या दाव्यांवर औपचारिक शपथ घेण्यास सांगितले आहे.
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत घेत, भारतीय निवडणूक आयोग (ECI) भारतीय जनता पक्षाशी (BJP) मिलीभगत करून निवडणुका "चोरत" आहे. राहुल गांधी यांनी कर्नाटकातील महादेवपुरा मतदारसंघाकडे लक्ष वेधले आणि डुप्लिकेट मतदार, अवैध पत्ते आणि मोठ्या प्रमाणात मतदारांमुळे 1 लाखाहून अधिक मतांची "मत चोरी" झाल्याचा आरोप केला.
तिन्ही राज्यांच्या निवडणूक आयोगाच्या सीईओंनी राहुली गांधींना मतदार नोंदणी नियम, 1960च्या नियम 20(3)(ब) अंतर्गत अशा मतदारांच्या नावांसह शपथेवर स्वाक्षरी करण्यास सांगितले आहे. या प्रतिज्ञापत्रानुसार आवश्यक कार्यवाही सुरू करता येईल, अशी भूमिका निवडणूक आयोगाने घेतली आहे.
निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांच्या आरोपांना आणि दाव्यांना 'दिशाभूल करणारे' म्हटले आहे. परंतु राहुल गांधींना वाटत असेल की, ते जे बोलत आहेत ते खरे आहे, तर त्यांनी मतदार नोंदणी नियम 1960च्या नियम 20(3)(ब) नुसार घोषणापत्र/शपथपत्रावर स्वाक्षरी करावी आणि आजच ते हरियाणाच्या सीईओंकडे सादर करावे, असे आवाहन निवडणूक आयोगाने दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.