Bachchu Kadu On Congress : बच्चू कडू निवडणुकीतील प्रकारांवर संतापले; काँग्रेसनं काय 'पाप' ते सांगितले

Bachchu Kadu Criticizes Congress Over EVM Machine on Rahul Gandhi & Sharad Pawar Election Claim in Ahilyanagar : अहिल्यानगर दौऱ्यात बच्चू कडू यांनी EVM मशिनवरून काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली.
Bachchu Kadu On Congress
Bachchu Kadu On CongressSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics news : राहुल गांधी यांच्या पाठोपाठ शरद पवार यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन व्यक्ती भेटल्या, त्यात त्यांनी महाराष्ट्रात 160 जागा जिंकून देऊ, असा दावा केल्याने राज्यासह देशाच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे. शरद पवार यांच्या या दाव्यावरून राज्यातील राजकारण ढवळून निघत असताना, बच्चू कडू यांची या सर्व गदारोळावर संतापले आहेत.

बच्चू कडू यांनी, 'राहुल गांधी यांच्या दाव्यानुसार एकाच घरात 80 नाव काढले ते काय खोटं आहेत का? मात्र 'EVM' मशिनचं पाप त्यांनीच आणलं आहे. 'EVM' मशिनचा संस्थापक-अध्यक्ष काँग्रेसच आहे', असा घणाघात केला.

बच्चू कडू अहिल्यानगर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विधानावर माध्यमांशी बोलले. परंतु त्यांनी 'EVM' मशिनवरून काँग्रेसवर निशाणा साधताना भाजपवर देखील जोरदार हल्ला चढवला.

बच्चू कडू म्हणाले, "लोकशाही संपली आहे. एकाच घरात 80 नाव राहुल गांधी यांनी काढली, ते काय खोटं आहे का? मात्र 'EVM' मशिनचं पाप त्यांनीच आणलं आहे. या 'EVM' मशिनचा संस्थापक अध्यक्ष काँग्रेसचं (Congress) आहे." एकेकाळी मोदी म्हणायचे 'EVM' मशिनचा हटाव, आता काय देशच खड्ड्यात टाकायला चालले आहेत. आज भाजप 'EVM' मशिनमुळे आले, तर भाजपने कार्यालयातून मतदान सुरू करावे, असा जोरदार हल्ला देखील चढवला.

Bachchu Kadu On Congress
Navneet Rana murder plot : नवनीत राणांच्या हत्येचा कट, आठ ते दहा मुस्लिम तरुणांची बैठक; आमदार राणांच्या दाव्यानं खळबळ

लाडकी बहीण योजनेवर बोलताना बच्चू कडू म्हणाले, "सरकारने आणलेल्या लाडकी बहिण योजनेचा, त्यांना फायदा झाला. आता 26 लाख महिलांची चौकशी सुरू केली आहे. सरकारचं काम संपलं आणि मतं भेटली, त्यावेळी तुम्ही पात्- अपात्र पाहिले नाही आणि आता समिती नेमण्यात येत आहे." खरंतर तुम्हाला सत्तेत यायचं होतं म्हणून तुम्ही लाडकी बहीण सुरू केली. आज भावाला लुटलं जात असेल, पंधराशे रुपये देऊन त्या बहिणीचं घर नावावर करून घेण्याचं काम हे सरकार करत आहे, अशी टीका देखील बच्चू कडू यांनी केली.

Bachchu Kadu On Congress
100 वर्षांच्या बहिणीने 104 वर्षांच्या भावाला बांधली राखी, पाहून तुम्ही भावूक व्हाल..

शेतकऱ्यांचे कर्ज माफी संदर्भात भाजप मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वेक्षण करून कर्जमाफी करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया दिली. भाजपच्या या निर्णयावर बच्चू कडू यांनी मंत्री बावनकुळे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

"बावनकुळे नेहमी फार्म हाऊस फार्म हाऊस करणारा माणूस आहे. त्यांना माहीत नसेल, तर त्यांनी पश्चिम महाराष्ट्र फिरलं पाहिजे. बावनकुळेंनी सांगितलेलं आम्हाला देखील कबूल आहे, व्यापारी शेतकरी, नोकरदार शेतकरी यांना वेगळे करा, राजकारणी शेतकरी देखील वेगळा करा, कारण अजित पवार आणि बावनकुळेंना देखील कर्जमाफीची गरज नाही. आमचे म्हणणे शेतकऱ्यांचे वर्गीकरण झालं पाहिजे. मात्र तुम्ही तारीख सांगा तुमचा अहवाल कधी येणार, आता समिती नेमली. मात्र अध्यक्षलाच माहीत नाही, अशी बनवाबनवी सरकारने थांबवली पाहिजे", असा घणाघात बच्चू कडू यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com