Rahul Gandhi Sarkarnama
देश

Rahul Gandhi assets case : राहुल गांधींच्या संपत्तीच्या चौकशीला सुप्रीम कोर्टाचा ब्रेक! CBI-ED तपासाचा आदेश रद्द; दिलासा तरी, टांगती तलवार कायम

Supreme Court sets aside Allahabad HC CBI-ED probe order in Rahul Gandhi assets case. Fresh hearing ordered after hearing Rahul Gandhi : बेहिशोबी मालमत्तेच्या आरोपांवर चौकशीचे आदेश देणारा अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला; नव्याने सुनावणी घेताना राहुल गांधींची बाजू ऐकण्याचे निर्देश

Pradeep Pendhare

Rahul Gandhi assets investigation : कर्नाटकमधील भाजप कार्यकर्ते एस. विग्नेश शिशिर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती असल्याचा आरोप करणारी याचिकेत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे.

राहुल गांधी यांच्या संपत्तीबाबत CBI, ED चौकशीचा आदेश देणारा अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. परंतु नव्याने प्रकरणाची सुनावणी घेताना, राहुल गांधी यांना पक्षकार करून त्यांची बाजू ऐकून घ्यावी, असे निर्देश दिले. यावरून राहुल गांधी यांच्याविरोधात न्यायालयीन लढाई सुरूच राहणार आहे.

भाजप (BJP) कार्यकर्ते एस. विग्नेश शिशिर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे बेहिशोबी मालमत्ता असल्याचा आरोप होता. या आरोपाच्या चौकशीसाठी, CBI आणि ED मार्फत चौकशी व्हावी, यासाठी मे 2026 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात याचिका दाखल केली होती.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा विदेश दौऱ्यांवर उत्पन्नापेक्षा अधिक खर्च झाला आहे. सुमारे 60 कोटी रुपयांवर खर्च झाला आहे. ही रक्कम त्यांच्या उत्पन्नांपेक्षा अधिक आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला होता. यावर लखनौ खंडपीठाने CBI आणि EDला तक्रारीची पडताळणी करून प्रगती अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता. 20 जुलैला CBIच्या प्रतिज्ञापत्रावर असमाधान व्यक्त करत नवीन अहवाल मागवला होता.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने अलाहाबाद उच्च न्यायालयाला या प्रकरणातील सर्व कायदेशीर मुद्द्यांवर नव्याने विचार करण्यास सांगितले आहे. राहुल गांधी यांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली.

याचिकाकर्त्याचा या प्रकरणाशी कोणताही थेट संबंध नसून, ही याचिका केवळ राजकीय हेतूने आणि कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर करून दाखल करण्यात आली आहे. यापूर्वी 17 ऑगस्ट 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या कामकाजाला अंतरिम स्थगिती दिली होती. उच्च न्यायालयाने पूर्वी कोणताही आदेश देण्यापूर्वी राहुल गांधी यांची बाजू ऐकून घेतली नव्हती, यावर कपिल सिब्बल यांनी युक्तिवादात लक्ष वेधले. आणि याच मुद्द्याची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली.

आता उच्च न्यायालयाने या प्रकरणात राहुल गांधी यांना पक्षकार करून त्यांची बाजू ऐकून घ्यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यानुसार या प्रकरणाची आता नव्याने उच्च न्यायालयाच्या खंडपीठात सुनावणी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT