RBI Repo Rate Hike : RBI रेपो दरवाढीबाबत 'SBI'चा यू-टर्न! अर्धा टक्का नाही, आता पाव टक्क्याचाच अंदाज; 'EMI'बाबत काय संकेत?

SBI economists now expect a 25 bps RBI repo rate hike in December 2026, warning that 50 bps increase could hurt India economic growth : डिसेंबरच्या पतधोरणाआधी SBI च्या अर्थतज्ज्ञांचा सुधारित अंदाज; अर्धा टक्का दरवाढ केल्यास आर्थिक स्थैर्य आणि विकासाला धोका निर्माण होण्याची भीती
RBI Repo Rate
RBI Repo RateSarkarnama
Published on: 
Updated on: 

SBI Repo Rate Forecast : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) डिसेंबरमध्ये होणाऱ्या पतधोरण आढाव्यात रेपो दरात किती वाढ करणार, याकडे अर्थविश्वाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) अर्थतज्ज्ञांनी अर्धा टक्का रेपो दरवाढ करण्याच्या निर्णयाबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे.

अर्धा टक्का दरवाढ केल्यास देशातील आर्थिक स्थैर्याला धोका निर्माण होण्यासोबतच आर्थिक विकासावरही प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पाव टक्का दरवाढ पुरेशी ठरेल, असा सुधारित अंदाज स्टेट बँकेच्या अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील आर्थिक अस्थिरता, इंधनाच्या किमतींमधील वाढ, देशातील महागाई आणि काही राज्यांमधील दुष्काळी परिस्थिती या बाबींचा विचार करून रिझर्व्ह बँकेने (RBI) व्याजदरवाढीचा निर्णय घ्यावा, असे स्टेट बँकेच्या अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. अर्धा टक्का दरवाढ केल्यास परकीय भांडवली गुंतवणुकीचा ओघ कमी होण्याची किंवा उलटण्याची, रुपयावरील दबाव वाढण्याची आणि आर्थिक घडामोडींना खीळ बसण्याची शक्यता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वी स्टेट बँकेच्या (Bank) अर्थतज्ज्ञांनी डिसेंबरच्या पतधोरणात अर्धा टक्का रेपो दरवाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, आता त्यांनी हा अंदाज बदलून पाव टक्क्याच्या दरवाढीची शक्यता वर्तवली आहे. जागतिक आर्थिक परिस्थिती, महागाईचा संभाव्य कल आणि देशांतर्गत आर्थिक घडामोडी लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने निर्णय घ्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

RBI Repo Rate
PT Usha Election : ऑलिम्पिक संघटनेत पी. टी. उषा यांचा पत्ता कट! पहिल्या महिला अध्यक्षांची निवडणुकीतून माघार; खुर्चीसाठी तिघांमध्ये लढत

ऑक्टोबरमधील पतधोरण आढाव्यावेळीही स्टेट बँकेच्या अर्थतज्ज्ञांनी अर्धा टक्का दरवाढीचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, प्रत्यक्षात रिझर्व्ह बँकेने पाव टक्क्याचीच वाढ केली होती. त्यावेळी पतधोरणाची भूमिका टप्प्याटप्प्याने कठोर केली जाईल, असे संकेत देण्यात आले होते. गेल्या चार वर्षांतील पहिली रेपो दरवाढ झाल्यानंतर महागाई, इंधन दर आणि रुपयाच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर आणखी दरवाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RBI Repo Rate
Shivsena Santosh Pawar missing : 50 लाखांच्या नोटांचा बॉक्स, व्हिडीओ व्हायरल अन् आता शाखाप्रमुख बेपत्ता? संदीप देशपांडे म्हणाले, 'अपहरण तर झाले नाही ना?'

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक 2 ते 4 डिसेंबरदरम्यान होणार आहे. या बैठकीत प्रमुख व्याजदरांबाबत निर्णय घेतला जाईल. दरम्यान, जागतिक आर्थिक परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा होत असल्याचे संकेत मिळत आहेत. परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढत असून रुपयावरील दबावही कमी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे रेपो दरात थेट अर्धा टक्का वाढ करण्याऐवजी पाव टक्का वाढ केली जाऊ शकते, असा अंदाज स्टेट बँकेच्या अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हचा अंदाज

दरम्यान, अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह डिसेंबरमधील पतधोरण आढाव्यात व्याजदर स्थिर ठेवण्याची शक्यता असल्याचेही स्टेट बँकेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अमेरिकेतील शेअर बाजारातील घसरण आणि आर्थिक घडामोडींमधील संभाव्य मंदी यामुळे फेडरल रिझर्व्हसमोर व्याजदरांबाबत निर्णय घेताना पेच निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अमेरिकेच्या पतधोरणाचा परिणाम जागतिक आर्थिक परिस्थितीवर आणि भारताच्या आर्थिक निर्णयांवरही होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.