PT Usha Election : ऑलिम्पिक संघटनेत पी. टी. उषा यांचा पत्ता कट! पहिल्या महिला अध्यक्षांची निवडणुकीतून माघार; खुर्चीसाठी तिघांमध्ये लढत

PT Usha withdraws from the Indian Olympic Association election after losing the athletes group poll. Gagan Narang and two others are in the race for president : गुणवान खेळाडूंच्या गटातून पराभव झाल्यानंतर अध्यक्षपदाची आशा संपुष्टात; आइस हॉकी संघटनेचा पाठिंबा मिळूनही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही, गगन नारंग यांच्यासह तिघे मैदानात
PT Usha
PT UshaSarkarnama
Published on: 
Updated on: 

Indian Olympic Association Election : भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडत आहे. पहिल्या महिला अध्यक्षा पी. टी. उषा यांनी निवडणुकीत माघार घेतली आहे.

गुणवान खेळाडूंच्या गटातून उषा यांना पराभवाचा धक्का बसल्याने, तेव्हाच त्यांच्या अध्यक्ष बनण्याच्या आशा संपुष्टात आल्या होत्या. निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी त्यांनी अर्ज न भरल्याने, त्यांनी निवडणुकीत माघार घेतल्यावर शिक्कामोर्तब झाला.

भारतीय ऑलिम्पिक संघटनेची नवी कार्यकारी परिषदेची पाच डिसेंबरला निवड होत आहे. याचवेळी चार वर्षे अध्यक्षा राहिलेल्या उषा यांचा कार्यकाळ संपुष्टात येईल. गुणवान खेळाडूंच्या (Sport) गटातून दहा डिसेंबर 2022 रोजी उषा या पहिल्या महिला अध्यक्षा झाल्या होत्या. पण याच गटातून त्यांना आता पराभव पत्कारावा लागला आहे.

उषा यांच्या अध्यक्षा बनण्याच्या आशा संपुष्टात येताच, त्यांना आइस हाॅकी संघटनेने पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्या पुन्हा अध्यक्षा होतील, अशी आशा बळावली होती. पण निवडणुकीच्या (Election) शेवटच्या दिवशी त्यांनी अर्जच दाखल केला नाही. त्याचवेळी त्यांनी निवडणुकीत माघार घेतल्यावर शिक्कामोर्तब झाला.

PT Usha
IAS Officer Harassment Case : महिला IAS अधिकाऱ्याच्या छळाचा आरोप; विजय यांच्या सत्ताधारी पक्षाच्या आमदारावर FIR, तामिळनाडूत खळबळ!

तिरंदाजी महासंघाचे सचिव वीरेंद्र सचदेवा, ऑलिम्पिक पदक विजेता नेमबाज गगन नारंग यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले आहेत. तलवारबाजी संघटनेचे राजीव मेहता देखील अध्यक्षपदासाठी इच्छुक असून ते मैदानात आहेत. त्यामुळे भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे.

PT Usha
Shivsena Santosh Pawar missing : 50 लाखांच्या नोटांचा बॉक्स, व्हिडीओ व्हायरल अन् आता शाखाप्रमुख बेपत्ता? संदीप देशपांडे म्हणाले, 'अपहरण तर झाले नाही ना?'

या जागांवर होणार लढत

माजी टेबल टेनिसपटू कमलेश मेहता यांनी कोषाध्यक्षपदासाठी अर्ज भरला असून, त्यांनी बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. उपाध्यक्षपदासाठी महिलांच्या एकमेव जागेसाठी अंजू बाॅबी जाॅर्ज यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. सहसचिवपदाच्या दोन जागांसाठी चार अर्ज दाखल झाले आहेत. कार्यकारी परिषदेच्या सहा जागांसाठी सर्वाधिक अर्ज आले आहेत. वरिष्ठ उपाध्यक्षपदासाठी दोन अर्ज आले आहेत.

कार्यकारी परिषदेची एकूण सदस्यसंख्या 16

अध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष, दोन उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, दोन सहसचिव आणि कार्यकारी परिषदेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. खेळाडू आयोगाच्या अध्यक्ष पी. व्ही. सिंधू आणि उपाध्यक्ष हरमनप्रीत सिंग हे देखील कार्यकारी परिषदेत सहभागी होतील. आयओसी सदस्याचा समावेश धरून कार्यकारी परिषदेची एकूण सदस्यसंख्या 16 इतकी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.