Rahul Gandhi Sarkarnama
देश

Rahul Gandhi on PM Modi : ट्रम्प-पुतिन-जिनपिंग एकाच टेबलावर, मोदी कुठे? राहुल गांधींचा 'तडजोडीच्या पंतप्रधानां'वर घणाघात!

Rahul Gandhi targets PM Modi over Trump, Putin and Xi Jinping meeting in China, saying a compromised Prime Minister can never sit at the global leaders table : तिन्ही महासत्तांच्या प्रमुखांच्या ऐतिहासिक बैठकीचा फोटो शेअर करत राहुल गांधींचा मोदी सरकारला थेट सवाल; 'काँग्रेस सत्तेत असती, तर भारताचे पंतप्रधान या टेबलावर असते'; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Pradeep Pendhare

India Global Politics : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या 'एक्स' खात्यावर एक फोटो शेअर करत, केंद्रातील सत्ताधारी भाजपचा चांगलेच घायाळ केले आहे. हा फोटो अमेरिका राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे अध्यक्ष क्लादिमिर पुतिन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचा आहे.

राहुल गांधी यांनी फोटो शेअर करताना, “काँग्रेस सत्तेत असती, तर भारताचे पंतप्रधान आज या टेबलावर बसलेले असते. तडजोडी केलेला पंतप्रधान या टेबलावर कधीच बसू शकत नाही,” असा टोला लगावला आहे.

चीनमधील (China) शेनझेनमध्ये हे तिघे दिग्गज नेते एकत्र आले होते. पहिल्यांदाच ऐतिहासिक त्रिपक्षीय बैठक पार पडली. या तिघांमध्ये जवळपास 80 मिनिटे चर्चा झाली. जागतिक शांतता, अण्वस्त्र धोके कमी करणे, ऊर्जा पुरवठा, संयुक्त राष्ट्रसंघातील सुधारणा आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयांचे अधिकारक्षेत्र या चार मुद्यांवर या तिघांमध्ये चर्चा झाली.

हाच धागा राहुल गांधी (Rahul Gandhi) नी पकडत, केंद्रातील सत्ताधारी भाजपला नाव न घेता डिवचले आहे. या तिघांचा फोटो 'एक्स'वर शेअर करत, भारताचे पंतप्रधान या टेबलवर चर्चेसाठी का नाहीत, असा अप्रत्यक्ष प्रश्न करत केंद्रातील सत्ताधाऱ्यांना डिचवले आहेत. राहुल गांधी यांनी, पुढे तडजोडी केलेला पंतप्रधान या टेबलावर कधीच बसू शकत नाही, असा टोला देखील लगावला आहे.

राहुल गांधी यांच्या या टीकेला सत्ताधारी कशापद्धतीने प्रत्युत्तर देते, याकडे देखील लक्ष लागले आहे. देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुका येऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रातील सत्ताधारी भाजप मोदी सरकार आणि विरोधक काँग्रेस एकमेकांविरोधात दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसत आहेत. यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरचे दाखले देत, भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोपांच्या फैरी अधिक तीव्र होणार असल्याचे हे संकेत आहेत.

आण्विक युद्धे नकोत

या तिन्ही देशांच्या प्रमुखांनी अणुयुद्ध कधीही जिंकता येत नाही आणि ते लढवले जाऊ नये यावर भर देताना अण्वस्त्र धोके कमी करणे आणि प्रसारबंदीवर एकमत व्यक्त केले. जागतिक बाजारपेठेत शुद्ध पेट्रोलियम उत्पादनांचे उत्पादन आणि पुरवठा वाढवण्याची योजनेवर भर देताना इंधन पुरवठा आणि ऊर्जा सुरक्षेवर भर देण्यासाठी सहमती दर्शवली.

जागतिक आव्हानांना प्रभावीपणे सामोरे जाणे

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य म्हणून या तिन्ही देशांनी जागतिक आव्हानांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघात सुधारणा करण्यावर भर दिला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (ICC) आणि तत्सम संस्थांनी आपल्या अधिकारक्षेत्राचा गैरवापर करू नये, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT