

Microfinance Company Seals House : दुष्काळ संपेपर्यंत मायक्रो फायनान्स कंपन्या, बँका, पतसंस्था व सावकारांनी शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीसाठी तगादा लावू नये, फोन करू नये किंवा घरी जाऊन दबाव आणू नये, अशा सूचना राज्य सरकारकडून असताना, मायक्रो फायनान्स कंपन्यांची कर्ज वसुली पठाणी पद्धतीने सुरू असल्याचे समोर आले आहे.
हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने थेट महिलेचे घर सील केले आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये हा प्रकार समोर आला आहे. मायक्रो फायनान्स कंपनीच्या या कार्यपद्धतीमुळे संतापाची लाट उसळली आहे.
लातूरच्या (Latur) ग्रामीण भागात मायक्रो फायनान्स, तसेच खासगी फायनस कंपन्यांकडून कर्जवसुली सक्तीने केली जात आहे. लातूरच्या उदगीरमधून, असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रमोद सुवर्णकार यांनी 2022मध्ये खासगी फायनान्स कंपनीकडून 10 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. यासाठी पत्नी मनीषा सुवर्णकार यांच्या नावे असलेले घर तारण ठेवण्यात आले होते. मात्र दुष्काळी परिस्थितीत कर्जाचे हप्ते थकल्याने दीड महिन्यापूर्वी हे घर फायन्सास कंपनीने सील केले.
मनीषा सुवर्णकार यांच्यावर आता भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे. मात्र आता शेतातील (Farmer) पीकही गेले, हाताला काम नाही, त्यामुळे घर भाडे भरायचे कसे हा प्रश्न त्यांच्यापुढे पडला. उत्पन्नाचे साधन बंद झाल्याने कर्जाचे हप्ते भरणे शक्य नाही. त्यात कर्जाचे हप्ते थकल्याने सिबिल खराब झाले असून दुसऱ्या बँकाही कर्ज देण्यास तयार नाहीत, अशी परिस्थितीत सुवर्णकार कुटुंब अडकले आहे.
एकीकडे डोक्यावर कर्जाचा डोंगर, दुसरीकडे राहण्यासाठी स्वतःचे घर नाही आणि आता भाडे भरण्याचीही ऐपत नाही. अशा परिस्थितीत मुलांना जगवायचे कसे असा प्रश्न मनीषा सुवर्णकार यांच्यासमोर उभा राहिला आहे. दुष्काळी परिस्थितीत कर्जवसुलीसाठी तगादा लावणार नाही, घर सील करणार नाही, अशी आश्वासने दिली जात असताना उदगीरमधील या प्रकरणामुळे मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या वसुली पद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
आगामी किमान आठ महिने मायक्रो फायनान्स कंपन्या, वैध सावकार, पतसंस्था आणि राष्ट्रीयकृत व खासगी बँकांनी कोणत्याही शेतकऱ्याकडे कर्जासाठी तगादा लावू नये किंवा फोन करू नये, अशा स्पष्ट सूचना आहेत. तरी देखील अशी पठाणी वसुली होत असल्याचे मराठवाड्यात सुरू आहेत. दुष्काळात अशी कर्ज वसुली करणाऱ्या मायक्रो फायन्सास कंपन्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी, असा जोर धरला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.