Rahul Gandhi Sarkarnama
देश

Rahul Gandhi : हरियाणातील पराभवावर राहुल गांधी म्हणाले, 'ज्या तक्रारी... '

Roshan More

Rahul Gandhi News: हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला भाजपने मोठा झटका दिला आहे. काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवली जात असताना भाजपने हरियाणामध्ये मोठा विजय मिळवला.

मंगळवारी (ता.8) हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. त्यानंतर आज बुधवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हरियाणातील पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी म्हणाले, 'हरियाणाच्या अनपेक्षित निकालाचे आम्ही विश्लेषण करत आहोत. अनेक विधानसभा क्षेत्रातून ज्या तक्रारी येत आहेत त्या आम्ही निवडणूक आयोगाला कळवत आहोत.

राहुल गांधींनी ट्विटरवर हरियाणाच्या आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. 'हरियाणातील सर्व नागरिकांच्या समर्थन आणि बब्बर शेर आमच्या कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमासाठी मनःपूर्वक आभार. हक्क, सामाजिक आणि आर्थिक न्याय आणि सत्यासाठी आम्ही हा संघर्ष सुरूच ठेवू आणि तुमचा आवाज बुलंद करत राहू.', असे आपल्या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

हरियाणामध्ये पराभव झाला असला तरी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची आघाडी जम्मू-काश्मीरमध्ये सत्तेत आली आहे. 'जम्मू आणि काश्मीरमधील लोकांचे मनापासून आभार. राज्यातील हा विजय 'इंडिया'चा विजय आहे. संविधानाचा विजय आहे. लोकशाहीचा विजय आहे.', असे राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

काँग्रेसचा आरोप काय?

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी हरियाणाच्या निकालावर गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. रमेश म्हणाले की, हरियाणा निवडणुकीचे निकाल आम्हाला मान्य नाहीत. कारण हा लोकशाहीचा पराभव आणि व्यवस्थेचा विजय आहे.

तर काँग्रेस नेते पवन खेरा यांनी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केला. खेरा म्हणाले, हिस्सार, महेंद्रगड आणि पानिपत जिल्ह्यांमधून सातत्याने तक्रारी येत आहेत की येथे ईव्हीएमची बॅटरी 99% आहे. जर मतदान झाले असेल आणि ईव्हीएम बंद असेल तर ईव्हीएमची बॅटरी 60% ते 70% हवी होती.आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT