Pune News : हरियाणातील मतमोजणीवर इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने, या मतमोजणी प्रक्रियेवर संशय व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मतमोजणीमध्ये काही संशयास्पद गोष्टी होत असल्याचं सांगितला आहे.
जम्मू कश्मीर आणि हरियाणा विधानसभेसाठीच मतमोजणी सध्या सुरू आहे. हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस (Congress) इंडिया आघाडीचे सरकार येणार, असं एक्झिट पोल सांगत होतं. तसंच काहीसं चित्र सुरवातीला मतमोजणीत पाहायला मिळालं काँग्रेसने मोठी आघाडी घेत तब्बल 65 जागांपर्यंतचा टप्पा गाठला. मात्र त्यानंतर अचानक एका तासामध्ये हरियाणातील चित्र बदललं आणि भाजपने जोरदार मुसंडी मारत बहुमताचा आकडा गाठला. दिवस अखेर पर्यंत भाजपला 50 जागांवर आघाडी होती, तर काँग्रेस 34 जागांवर आघाडी वर होतं. परिस्थितीत हरियाणामध्ये भाजपचं बहुमताचं सरकार होईल, असं चित्र पाहायला मिळत आहे.
पुणे दौऱ्या दरम्यान सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जम्मू-काश्मीर आणि हरियाणामधील कलांबाबत बोलताना सुळे म्हणल्या, दोन्ही राज्यांमध्ये फारच इंटरेस्टिंग असे निकाल लागलेत. लोकसभा इलेक्शननंतर (Election) चार दिवस जम्मू आणि काश्मीर मध्ये मी स्वतः जाऊन आले आहे. त्यावेळेस स्थानिक लोक या भागामध्ये मोठ्या प्रमाणात सैन्य असल्याचे सांगत होते आणि याचमुळे या भागात शांतता असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. त्यामुळे लोकं सध्या परिस्थितीला त्रासली होती, म्हणूनच अब्दुल्ला फॅमिलीला इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी मतदान केलं आहे. जम्मू-काश्मीरमधील लोकांच्या संघर्षाच्या काळात अब्दुल्ला फॅमिली त्यांच्यासोबत राहिली म्हणूनच लोकांनी त्यांना भरभरून मतदान दिलं आहे.
मात्र हरियाणाच्या निकालाबाबत मला आश्चर्य वाटत आहे. हरियाणा हे दिल्लीच्या जवळ असल्याने त्या ठिकाणच्या स्थानिक नेत्यांच्या भेटी सातत्याने होत होत्या. आता जो काही सर्व्हे त्या ठिकाणी येत आहे. त्यामध्ये आघाडीचा जो गॅप आहे. तो खूप कमी मतांचा आहे. भाजप काही जागांवरती 500 ते 1500 च्या मताधिक्याने आघाडीवर आहे. मी त्या ठिकाणच्या काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची बोलले, त्यांनी सांगितलं की, अनेक ठिकाणी काउंटिंग हे स्लो करण्यात आलं आहे. ज्या 15-18 जागांचा प्रश्न आहे, त्या ठिकाणी काउंटिंग अत्यंत धिम्या गतीने करण्यात येत आहे, असे सुप्रिया सुळेंनी सांगितलं.
तसंच त्या ठिकाणी व्यवस्थित माहिती देखील देण्यात येत नाही. काही ठिकाणी वाद देखील चालू आहेत. काही ठिकाणी त्या ठिकाणच्या डिसीने परस्पर जागा अनाउन्स केल्या आहेत. अशा प्राथमिक गोष्टी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांशी बोलल्यानंतर माझ्यापर्यंत पोचले आहेत. मात्र तिथे नेमकं काय झालं हे दोन-तीन तासांमध्ये सगळ्यांच्या समोर येईल, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. हरियाणामध्ये आम्ही एका जागा लढली. मात्र त्या ठिकाणी आम्हाला अपयश येताना दिसत आहे. आम्ही कुठेतरी कमी पडलो, असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.