Congress Screening Committee Sarkarnama
देश

Congress Screening Committee : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची स्क्रिनिंग कमिटी जाहीर; मधुसूदन मिस्त्री अध्यक्ष!

Congress Screening Committee and Madhusudan Mistry : जाणून घ्या कोण आहेत कमिटीचे सदस्य; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.

Mayur Ratnaparkhe

Vidhan Sabha Election and Congress : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने स्क्रिनिंग कमिटीची घोषणा केली आहे. मधुसूदन मिस्त्री यांना अध्यक्ष बनवण्यात आलं आहे.

याशिवाय सप्तगिरी शंकर उलाका, मन्सूर अली खान आणि श्री वेल्ला प्रसाद स्क्रिनिंग कमिटी यांना सदस्य बनवलं गेलं आहे. महाराष्ट्रात या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे.

मधुसूदन मिस्त्री काँग्रेसचे(Congress) अनुभवी नेत्यांपैकी एक आहेत. त्यांना राहुल गांधींच्या निकटवर्तीयही समजले जाते. पक्षात त्यांनी अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांच्याच अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची निवडणूक झाली होती. 2014च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पंतप्रधान मोदींविरोधातही निवडणूक लढवली आहे.

सप्तगिरी शंकर उलाका यंदा लोकसभा निवडणूक जिंकून संसदेत पोहचले आहेत. ओडिशाच्या कोरापुट मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला आहे, ते छत्तीसगड काँग्रेसचे सचिव देखील आहेत. मन्सूर अली खान बंगळुरू मतदारसंघातून यंदा काँग्रेसचे लोकसभा उमेदवार होते. परंतु त्यांना विजय मिळवता आलेला नाही. या जागेवर भाजपचे(BJP) पीसी मोहन यांनी विजय मिळवला.

याशिवाय श्रीवेल्ला प्रसाद यांनी छत्तीसगड विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसचे पर्यवेक्षक म्हणून भूमिका निभावलेली आहे. आता तर ते तामिळनाडू काँग्रेसचे सचिव आहेत. काँग्रेसच्या एसी विभागाचे ते निमंत्रकही होते.

महाराष्ट्रात काँग्रेस महाविकास आघाडीमधील प्रमुख पक्ष आहे. यंदा लोकसभेत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगले यश मिळाले आहे, त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीही महाविकास आघाडीकडून(Mahavikas Aghadi) एकत्रितपणेच लढवली जाणार असल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता, त्यामुळे पक्षाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी काँग्रेसने 13 जागांवर विजय मिळवला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT