Sanjay Raut, Narendra Modi  Sarkarnama
देश

Sanjay Raut Questions PM Modi: ...म्हणून तुम्ही राष्ट्रवादी फोडली?; राऊतांचा मोदींवर घणाघात; अडवाणींना राष्ट्रपती होण्यापासून कोणी रोखले?

सरकारनामा ब्यूरो

New Delhi : "शरद पवार (Sharad Pawar) यांना पंतप्रधान होण्यापासून काँग्रेसने रोखले," असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींच्या या विधानाचा समाचार घेतला. “शरद पवारांना पंतप्रधान होण्यापासून काँग्रेसने रोखलं, म्हणून तुम्ही त्यांचा पक्ष फोडलात का?” असा थेट सवाल राऊतांनी मोदींना केला.

माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना राष्ट्रपती होण्यापासून कोणी रोखले? असा सवालही राऊतांनी उपस्थित केला. दिल्लीत राऊत माध्यमांशी बोलत होते. राऊत म्हणाले, “शरद पवार आणि काँग्रेस यांचे वेगळे राजकारण आहे. लालकृष्ण अडवाणींना राष्ट्रपती होण्यापासून पंतप्रधानांनी रोखले किंवा अडवाणींना राजकीय संन्यास घेण्यास सांगितला. हा भाजप अंतर्गत प्रश्न आहे. शरद पवार आणि काँग्रेस हा दोन्ही पक्षांचा अंतर्गत प्रश्न आहे.”

"शिवसेना भाजपसोबत सत्तेत होती त्यावेळी 'सामना' वृत्तपत्रात माझ्यावर टीका केली जायची. कारण नसताना वाद निर्माण होत असे. आम्ही अनेक वेळा सहन केले," असे मोदींनी एनडीएच्या बैठकीत मंगळवारी सांगितले. त्यावर राऊत म्हणाले, " कितीही हल्ले केले तरी सामना आणि शिवसेना शरण जात नाही, ही त्यांची वेदना त्यांनी बोलून दाखवली. मोदींना 'सामना'वर आणि शिवेसनेच्या भूमिकेवर खासदारांच्या बैठकीत चर्चा करावी लागते, कारण आम्ही ओरिजिनल आहोत. तुम्हाला याची दखल घ्यावी लागते, कारण उद्धव ठाकरेंच्या भूमिका मान्य आहेत,"

शिवसेनेचे (ठाकरे गट) मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून नरेंद्र मोदी यांच्यावर टीका होत असते. यावर मोदी म्हणाले, "तुम्हाला सत्तेत पण राहायचे आहे आणि तुम्हाला आमच्यावर टीका पण करायची आहे या दोन गोष्टी एकत्र कशा चालतील? शिवसेना भाजपसोबत सत्तेत होती त्यावेळी सामना वृत्तपत्रात माझ्यावर टीका केली जायची. कारण नसताना वाद निर्माण होत असे. आम्ही अनेक वेळा सहन केले,"

उद्धव ठाकरे यांच्यामुळे युती तुटली, असा आरोप मोदींनी केला आहे. त्याला राऊतांनी प्रत्युत्तर दिले. "आपली युती तुटली आपण वेगळे झाले आहोत, असे भाजपकडून अधिकृतपणे एकनाथ खडसे यांनी फोन करून उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं. २०१४ मध्ये शिवेसनेची साथ कोणी आणि का सोडली हे देशाने पाहिले," असे राऊत म्हणाले.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT