Narendra Modi
Narendra Modi Sarkarnama
देश

Narendra Modi : 'वॉरंटी' संपलेला पक्ष 'गॅरंटी' काय देणार?; पंतप्रधानांचा मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

Sunil Balasaheb Dhumal

Karnataka Assembly Elections 2023 : कर्नाटकमध्ये काँग्रेस-भाजप-जेडीएस अशी तिरंगी लढत होत आहे. या निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे सध्या राज्यात विधानसभा निडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. दरम्यान, जनता दल (एस)चे सर्वेसर्वा माजी पंतप्रधान वयाच्या नव्वदीतही प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (ता. २७) भाजपच्या कर्नाटकमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना 'व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे' मार्गदर्शन केले.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसने (Congress) दिलेल्या वचननाम्यावर सडकून टीका केली. त्यासाठी त्यांनी देशभरात काँग्रेसच्या २०१४ आणि २०१९ मधील पराभवाचे उदाहरण दिले. पंतप्रधान मोदी म्हणाले, "ज्या पक्षाची 'वॉरंटी' संपली आहे, ते जनतेला काय म्हणून 'गॅरंटी' देणार आहेत. जे स्वतःचा पराभव टाळू शकत नाहीत त्यांनी दिलेल्या आश्वासनांना काहीच अर्थ नाही." तसेच त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्याचा मंत्रही दिला.

नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले, "बुथवर आपण विजय मिळविला तर आपोआपच आपला राज्याच्या निकालातही विजय निश्चित होतो. त्यामुळे बुथस्तरावर घेत असलेल्या कष्टाला जास्त महत्व आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून मी कायम कर्नाटकच्या जनतेसोबतच आहे. कर्नाटकमधील जनता राज्यात स्थिर सरकार आणण्यासाठी भाजपाला संपूर्ण बहुमत देईल."

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या टीकेनंतर काँग्रेसचे नेते जयराम रमेश (Jayram Ramesh) यांनी एक ट्विट करून पलटवार केला आहे. जयराम रमेश म्हणाले, “अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांच्यानंतर आता पंतप्रधान मोदींनी चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. त्या वक्तव्यातून भाजप आणि त्यांच्या नेत्यांधील निराशा दिसते. १० मे रोजी कर्नाटकातील (Karnataka) जनता ४० टक्के कमिशन सरकार संपवण्याची गॅरंटी कर्नाटकची जनता देईल."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT