APMC Election in State : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी शुक्रवारी मतदान

Maharashtra APMC : रविवारी होणार ८८ बाजार समित्यांचे मतदान
APMC Election
APMC ElectionSarkarnama

APMC Voting News : उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार राज्यात २५७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका सुरू आहेत. या बाजारसमित्यांसाठी शुक्रवारी (ता. २८) आणि रविवारी (३०) मतदान पार पडणार आहे. शुक्रवारी १४७ तर रविवारी ८८ बाजार समित्यांसाठी मतदान होणार आहे. दरम्यान, राज्यातील १८ बाजारसमित्यांची निवडणूक बिनविरोध झाली आहे.

APMC Election
APMC Election News: सत्ताधाऱ्यांना शॉक...एकाला एकच मत देता येणार!

राज्यात दहा महिन्यांपूर्वी सत्ताबदल झाला आहे. तसेच २०२४ मध्ये राज्याची विधानसभेची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC Election) निवडणुकीच्या प्रचारात चुरस दिसून आली. या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसह ठाकरे गट व शिवसेनेसह इतर पक्षांतील बडे नेते उतरले आहेत. त्यामुळे पॅनलच्या माध्यमातून बाजार समित्यांवर युती की महाविकास आघाडीचे वर्चस्व राहणार, याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

APMC Election
Jayant Patil News : राष्ट्रवादीत भाकरी फिरणार; जयंत पाटलांच्या जागी 'या' तीन नावांची चर्चा!

राज्यातील (Maharashtra) कृषी उत्पन्न बाजारसमित्यांच्या निवडणुका ३० एप्रिलपूर्वी घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होत. त्यानुसार राज्यातील २८१ पैकी २५७ बाजार समित्यांच्या निवडणूक पार पडत आहेत. यात पुणे (Pune), सातारा, सांगली, कोल्हापूर, लातूर, नांदेड, बीड, धाराशीव, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, अकोला, नाशिक, जळगाव (Jalgaon) यांसारख्या मोठ्या बाजार समित्यांचाही समावेश आहे. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या भागात ताकद लावली आहे.

APMC Election
PCMC News : पालिका आयुक्त भाजपचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे वागतात; राष्ट्रवादीचा हल्लाबोल

या बाजार समित्यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी भाजप आणि महाविकास आघाडी आमने-सामने ठाकल्याचे दिसून येत आहे. तर काही ठिकाणी स्थानिक आघाड्यांना महत्व देत सर्व पक्षीय पदाधिकारी एकत्र आले आहेत. तसेच बाजार समितीवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी एकाच पक्षातील दोन गटांमध्ये लढत होत असल्याचेही दिसून येत आहे. दरम्यान, स्थानिक राजकारणातील बदलेल्या गणितांमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे.

APMC Election
Dr. Amol Kolhe News : उदयनराजेंच्या भेटीनंतर डॉ. अमोल कोल्हे म्हणाले...तर आयुष्याची मजा संपून जाईल

बाजार समितीसाठी सहकारी संस्था, ग्रामपंचायत, व्यापारी व अडते, तसेच हमाल व तोलारी मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातून सदस्यांना निवडून दिले जाणार आहे. एका मतदाराचे नाव एकाच मतदारसंघाच्या अंतिम मतदारयादीत एकापेक्षा जास्त वेळेस समाविष्ट असले तरीही त्यास त्या मतदारसंघातून निवडून देण्यात येणाऱ्या सदस्य संख्येइतकेच मतदान करता येणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com