Congress  Sarkarnama
देश

Congress News: धक्क्यावर धक्के सहन केलेल्या काँग्रेससाठी आनंदाची बातमी; विधान परिषदेच्या सातपैकी पाच जागा खेचून आणल्या, भाजपला मोठा धक्का

Karnataka Vidhan Paridhad : महाराष्ट्राच्या शेजारी अससेल्या कर्नाटक राज्यात विधानपरिषदेच्या सात जागांसाठी निवडणूक पार पडली. त्या निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत.त्यात काँग्रेसनं मोठा विजय मिळवत भाजपला जोर का झटका दिला आहे.

Deepak Kulkarni

Karnataka News: महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी गुरुवारी(ता.18 जून) मतदान पार पडलं आहे. महायुतीनं मतदानापूर्वीच मोठी राजकीय 'मास्टर खेळी'नं विरोधकांना पराभवाचा धक्का दिला होता. राज्यातील 11 पैकी तब्बल 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. उर्वरित जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणुकांमध्ये काँग्रेससह महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसण्याची शक्यता आहे.अशातच निराशाजनक कामगिरी व पराभवाचे धक्क्यावर धक्के सहन केलेल्या काँग्रेस पक्षासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे.

महाराष्ट्राच्या शेजारी अससेल्या कर्नाटक राज्यात विधानपरिषदेच्या सात जागांसाठी निवडणूक पार पडली. त्या निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत.त्यात काँग्रेसनं मोठा विजय मिळवत भाजपला जोर का झटका दिला आहे.

यात काँग्रेसने सातपैकी तब्बल पाच आणि भाजपनं दोन जागा जिंकल्या आहेत. तर कुमारस्वामींच्या जेडीएसनेही या निवडणुकीत उमेदवार उभा केला होता, परंतु त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

काँग्रेसकडून काही दिवसांपूर्वीच कर्नाटकमध्ये मोठा फेरबदल करण्यात आला होता. सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्यानंतर तिथे डी.के.शिवकुमार यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली होती. यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत कर्नाटकमध्ये काँग्रेसनं भाजपला धोबीपछाड देत मोठा विजय खेचून आणला आहे.

क्रॉस वोटिंगचा नेहमी फटका सहन करावा लागत आलेल्या काँग्रेसनं यावेळी आपली चूक सुधारली होती. या विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी मुख्यमंत्री डीएक शिवकुमार यांनी मॉक पोलिंग घेण्यात आलं होतं. काँग्रेसने आपल्या सर्व 135 आमदारांना एका रिसॉर्टमध्ये हलवलं होतं.

काँग्रेसचे 135 पैकी 40 आमदार हे पहिल्यांदा निवडून आले आहेत.त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून खबरदारीचा उपाय म्हणून विधानपरिषदेच्या मतदानाआधी रिसॉर्टमध्येच आमदारांसाठी मॉक मतदान प्रक्रिया राबवण्यात आली होती.

कर्नाटक विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे पाच विजयी उमेदवारांमध्ये बीके हरिप्रसाद, थिप्पन्नप्पा कामकनूर, पीव्ही मोहन, शिवन्ना बीएस(मालवल्ली) आणि विनय कार्तिक यांचा समावेश आहे. तर लिंगराज पाटील आणि रघु आर या भाजपच्या उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. या निवडणुकीत जनता दल एसचे उमेदवार गोविंदराजू यांना पराभव सहन करावा लागला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT