CM Politics : शिवकुमारांनी जे पेरलं तेच आता उगवलं, विद्यमान उपमुख्यमंत्र्याचा 'CM' खुर्चीवर डोळा; तीन वेळा संधी हुकल्याची व्यक्त केली खंत

Karnataka Deputy CM Reflects on Missed CM Chances : कर्नाटक काँग्रेसमध्ये नुकताच बंड शमल्याचे चित्र असून कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून डी. के. शिवकुमार यांनी शपथ घेतली आहे. पण आता त्यांच्या सरकारमधील उपमुख्यमंत्र्यांची खदखद समोर आली आहे.
Karnataka CM change speculation; DCM DK Shivakumar And CM Siddaramaiah
Karnataka CM change speculation; DCM DK Shivakumar And CM Siddaramaiah sarkarnama
Published on
Updated on

Karnataka Political News : कर्नाटकात मधल्या काळात मोठे वादळ घोवत होते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना हटवण्यासाठी डी. के. शिवकुमार यांनीच लॉबिंग केले होते. त्यानंतर दिल्लीत काँग्रेस हायकमांडने यावर निर्णय घेतला आणि शिवकुमार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री झाले. यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळात काही नव्या चेहऱ्यांना संधी तर सिद्धरामय्यांच्या जवळच्या काही लोकांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल अशी चर्चा आहे. अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही.

तोच आता विद्यमान उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी मुख्यमंत्री होण्याची तीन वेळा संधी हुकल्याची खंत बोलून दाखवत खळबळ उडवून दिली आहे. या विधानामुळे आता शिवकुमारांनी मुख्यमंत्रीच्या खुर्चीसाठी जे पेरलं तेच आता उगवलं अशी चर्चा होताना दिसत आहे.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर हे तुमकूर येथील सिद्धार्थ शिक्षण संस्थेत आयोजित सत्कार समारंभाला आले होते. या समारंभात बोलताना त्यांनी आपल्या राजकीय प्रवासातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा उल्लेख केला. याचवेळी त्यांनी, आपल्या हातातून मुख्यमंत्रिपदाची संधी तीन वेळा गेल्याची खंत व्यक्त केली आहे.

Karnataka CM change speculation; DCM DK Shivakumar And CM Siddaramaiah
Karnataka Politics: कर्नाटकात 'डीकेएस'पर्व; 'सिध्दा'ही रिंगणात राहणार; काँग्रेसचे 'दक्षिणापथ', '२०२९'चाही बिगुल

यावेळी ते म्हणाले, माझे नशीब की दुर्दैव माहीत नाही; पण मला मुख्यमंत्री होता आले नाही. परमेश्वर म्हणाले, ‘२०१३ मध्ये मी निवडणुकीत पराभूत झालो. त्यावेळी मी जिंकलो असतो, तर सिद्धरामय्या मुख्यमंत्री झाले नसते. २०१८ मध्ये धर्मनिरपेक्ष जनता दलासोबत महाआघाडीचे सरकार स्थापन झाले, तेव्हाही मला मुख्यमंत्री होण्याची संधी होती.

मात्र, काही कारणांमुळे एच. डी. कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री करण्यात आले.’ ते पुढे म्हणाले, ‘आताही मुख्यमंत्रिपदासाठी आणखी एक संधी होती; पण तीही मिळाली नाही. राजकारणात अनेक अनपेक्षित घडामोडी घडत असतात. त्यामुळे मुख्यमंत्रिपद मिळाले नाही.’

Karnataka CM change speculation; DCM DK Shivakumar And CM Siddaramaiah
Karnataka Politics : सिद्धरामय्यांची खुर्ची धोक्यात? काँग्रेसमध्ये बदलाच्या चर्चा पुन्हा तेजीत, शिवकुमारांची ताकद वाढली

तथापि, पक्षाने आपल्यावर मोठी जबाबदारी सोपविल्याचे सांगत त्यांनी समाधान व्यक्त केले. ‘सध्या मला उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे. पक्षाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडू, असे परमेश्वर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com