Shiv Sena split : खासदार फुटताच ‘मातोश्री’वर खलबतं; उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, सुत्र फिरताच बंडखोरांची धडधड वाढली!

Opration tiger News : काही तांत्रिक अडचणीमुळे फुटलेले हे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वर्धापनदिनी 19 जूनला शिवसेनेत प्रवेश करणार नाहीत.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार नवी दिल्लीत बोलावलेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहिले नसल्याने पक्षात फूट पडणार हे आता निश्चित मानले जात आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे फुटलेले हे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वर्धापनदिनी 19 जूनला शिवसेनेत प्रवेश करणार नाहीत. तर दुसरीकडे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मातोश्रीवर शुक्रवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. त्यामध्ये मोठा निर्णय घेणार असल्याने बंडखोर खासदारांची धडधड वाढली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वर्धापनदिनी १९ जूनला शिवसेनेत प्रवेश करणार होते. मात्र, त्यांचा प्रवेश लांबणीवर पडला आहे. २० जूनला पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर २१ किंवा २२ जूनला हे सहा खासदार अधिकृतरित्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत फूट पडल्याचे निश्चित मानले जात आहे.

Uddhav Thackeray
Shivsena MP News: 'आमच्या एका खासदारासाठी 50 कोटींची डील, 4 कोटी अ‍ॅडव्हान्स, दर महिन्याला 1 कोटी...'; बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

त्यातच आता उद्धव ठाकरे ऍक्शनमोडवर आले आहेत. त्यांनी डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मातोश्रीवर शुक्रवारी दुपारी 12 वाजता प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. मुंबईतील खासदार संजय दिना पाटील यांच्या ईशान्य मुंबई मतदारसंघातील सर्वच पदाधिकारी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. सुरवातीला याठिकाणी संघटनात्मक बदल करण्यात येणार आहेत. त्यानंतर या ठिकाणी संघटनात्मक बांधणी नव्याने केली जाणार आहे.

Uddhav Thackeray
Shiv Sena crisis : ठाकरेंच्या 6 खासदारांनी टाकलेल्या डावासमोर कोणतीच 'स्ट्रॅटेजी' चालेना; पहिलीच चाल फसली?

त्यासोबतच आगामी काळात या मतदारसंघाच्या बाबतीत रणनीती आखली जाणार आहे. त्यासोबतच त्या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन मतदारसंघ बांधणीसाठी गेम प्लॅन आखला जाणार आहे. या पुढील काळात बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना कानमंत्र दिला जाणार आहे. त्यामुळे बंडखोरी केलेल्या सहा खासदारांची धडधड वाढली आहे.

Uddhav Thackeray
Shivsena MP Split: उद्धव ठाकरेंच्या बंडखोर 6 खासदारांचा वेगळा गट,'कॅप्टन'ही ठरला? पोलिस पुरवणार थेट 'वाय प्लस' सुरक्षा...

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून गुरुवारी (ता.18 जून) संसदीय पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून सर्व खासदारांना व्हीपही जारी करण्यात आला होता. तसेच या बैठकीकडे खासदारांच्या एकनिष्ठतेची 'लिटमस टेस्ट' म्हणून पाहिले जात होते. या बैठकीला अनिल देसाई, अरविंद सावंत व राजाभाऊ वाजे हे केवळ तीन खासदार उपस्थित राहिले. तर ऑपरेशन टायगरमध्ये शिंदेसोबाबत जाणारे सहा खासदार गैरहजर राहिले. त्यामुळे फूट निश्चित मानली जात आहे.

Uddhav Thackeray
Shivsena MP News: 'आमच्या एका खासदारासाठी 50 कोटींची डील, 4 कोटी अ‍ॅडव्हान्स, दर महिन्याला 1 कोटी...'; बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com