LaluPrasad Yadav, Tejaswi Yadav Sarkarnama
देश

Crisis in Bihar Politics : लालूंना सत्तेसाठी हवेत केवळ आठ आमदार; नितीशकुमारांनी साथ सोडल्यास असं असेल गणित

Rajanand More

Bihar News : बिहारमधील राजकारण तापलं असून संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष व मुख्यमंत्री नितीशकुमार हे पुन्हा भाजपसोबत जाण्याची चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन नितीशकुमार भाजपच्या पाठिंब्याने पुन्हा सत्तेत येतील, असे तर्कवितर्क लढवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादवही तयारीला लागल्याची चर्चा आहे. (Crisis in Bihar Politics)

बिहारमध्ये (Bihar) सत्तास्थापनेसाठी 122 हा जादूई आकडा आहे. नितीशकुमारांनी (Nitish Kumar) साथ सोडल्यास लालूंना (LaluPrasad Yadav) आठ आमदारांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. बिहार विधानसभेत 243 सदस्य असून सध्या आरजेडीकडे 79 आमदार आहेत. मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसचे (Congress) 19 आणि डाव्या पक्षांचे 16 आमदार आहेत. या आमदारांचा एकूण आकडा 114 पर्यंत पोहोचतो. त्यामुळे त्यांना आणखी आठ आमदार जमवावे लागणार आहेत.

माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्या पक्षाचे चार आमदार आहेत. एमआयएमचा एक आमदार आणि एक अपक्ष आमदार आहे. लालूंना त्यांनाही सोबत घेतले तरी हा आकडा 120 पर्यंत थांबतो. त्यानंतरही आणखी आमदारांची गरज भासते, तर लालूंकडून आमदारांची जुळवाजुळव करण्याआधीच नितीशकुमार राजीनामा देऊ शकतात, असेही बोलले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लालूच्या घरीही काही आमदारांची बैठक सुरू असल्याचे समजते. भाजपनेही आपल्या आमदारांना पटनामध्ये थांबण्यास सांगितले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांच्याशिवाय केंद्रीयमंत्री अश्विनी चौबेंनीही दिल्ली गाठली आहे. त्यांच्यासोबत जेडीयूचे नेते के. सी. त्यागी असल्याची चर्चा आहे. पण जेडीयू आमदार खालिद अन्वर यांनी हा दावा फेटाळून लावला.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी काल सार्वजनिक कार्यक्रमात घराणेशाहीवर वक्तव्य केले होते. त्यांनी लालूंवर निशाणा साधल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर लालूंच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी ट्विटरवरून मुख्यमंत्र्यांवर टीका केली. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये मोठा दुरावा निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. पण काही वेळातच त्यांनी हे ट्विट डीलीट केले.

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT