Bharat Jodo Nyay Yatra : राहुल गांधींची ‘अशी ही बनवाबनवी’! यात्रेत त्यांचा डुप्लिकेट असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा

Himanta Biswa Sarma : हिमंत बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींना निवडणुकीनंतर अटक करणार असल्याचे सांगितले आहे.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Assam News : काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा गुवाहाटीत आल्यानंतर पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली. या प्रकारानंतर काँग्रसचे नेते राहुल गांधी व इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांना लोकसभा निवडणुकीनंतर अटक करणार असल्याचे आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितले आहे. त्यानंतर आता त्यांनी मोठा दावा केला आहे. (Bharat Jodo Nyay Yatra)

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याकडून देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री म्हणत हिमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. सरमांनीही राहुल गांधींना टीकेचे बाण सोडले. दोघांमधील हा वाद थांबण्याचे नाव घेत नाही. आता सरमा यांनी मोठा दावा केला आहे. यात्रेदरम्यान राहुल हे डुप्लिकेटचा वापर करीत आहेत. बसमध्ये समोर येऊन हात हलवणारा व्यक्ती राहुल गांधी नसून त्यांचा डुप्लिकेट असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Rahul Gandhi
Lok Sabha Election 2024 : येडियुरप्पांचा काँग्रेसला दे धक्का! माजी मुख्यमंत्र्यांना लोकसभेआधी पुन्हा आणले भाजपमध्ये

काय म्हणाले मुख्यमंत्री सरमा?

सरमा म्हणाले, काँग्रेसमधीलच काही लोकांना मला सांगितले की, राहुल गांधी जास्तीत जास्त वेळ बसमधील एका खोलीत आठ जणांसोबत असतात. जर राहुल गांधी बसमधील त्या खोलीतच थांबत असतील तर बससमोरील काचेतून लोकांना दिसणारा व्यक्ती कोण आहे, असा प्रश्न सरमा यांनी उपस्थित केला. ते राहुल गांधी नाहीत. ते डुप्लिकेटचा वापर करीत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तपास सीआयडीकडे

राहुल गांधींवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास आता सीआयडीकडे (CID) सोपवण्यात आला आहे. आसामचे पोलिस महासंचालक जी. पी. सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘या प्रकरणाचा विशेष तपास पथकाकडून तपास केला जाणार असून त्यासाठी हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्यात आले आहे.’

लोकसभा निवडणुकीनंतर अटक

राहुल गांधी यांना लोकसभा निवडणुकीनंतर अटक करणार असल्याचे सरमा यांनी बुधवारी सांगितले होते. आसाममध्ये अशांतता निर्माण करण्याच्या उद्देशानेच न्याय यात्रेत जाणिवपूर्वक प्रक्षोभक भाषणे करण्यात आल्याचा आरोप सरमा यांनी केला आहे.

R...

Rahul Gandhi
BJP Election Campaign : …तभी तो सब मोदी को चुनते हैं! भाजपचं नवं गाणं, प्रचाराचा नारळ फोडला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com