Lok Sabha Election 2024 : येडियुरप्पांचा काँग्रेसला दे धक्का! माजी मुख्यमंत्र्यांना लोकसभेआधी पुन्हा आणले भाजपमध्ये

Jagadish shettar : विधानसभा निवडणुकीआधीच शेट्टार यांनी काँग्रेसमध्ये केला होता प्रवेश...
Jagadish Shettar joins BJP
Jagadish Shettar joins BJPSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. कर्नाटकातील लिंगायत समाजाचे बडे नेते व माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केल्याने लोकसभा निवडणुकीत भाजपची ताकद वाढली आहे. (Lok Sabha Election 2024)

मागील वर्षी कर्नाटक विधानसभा निवडणुकी (Karnataka Assembly Election) आधी एप्रिलमध्ये शेट्टार यांनी भाजपला (BJP) रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तिकीट मिळणार नसल्याने त्यांनी काँग्रेसची (Congress) वाट धरली होती. लिंगायत समाजाचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. काँग्रेसला त्याचा फायदाही झाला. पण खुद्द शेट्टार यांना पराभव पत्करावा लागला. तेव्हापासून ते काँग्रेसमध्ये सक्रीय दिसले नाहीत. (Jagadish Shettar joins BJP)

Jagadish Shettar joins BJP
BJP Election Campaign : …तभी तो सब मोदी को चुनते हैं! भाजपचं नवं गाणं, प्रचाराचा नारळ फोडला

आता लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीच्या तोंडावर शेट्टार पुन्हा भाजपमध्ये आले. त्यांनी गुरूवारी दिल्लीतील भाजप मुख्यालयात केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, त्यांचे पुत्र व भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्रही उपस्थित होते. शेट्टार यांच्या घरवापसीमध्ये येडियुरप्पा यांचीच खेळी असल्याची चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विधानसभा निवडणुकीत शेट्टार यांचा हुबळी धारवाड मतदारसंघात पराभव झाला होता. त्यांना भाजपचे महेश तेंगिनाकाई यांनी सुमारे 34 हजार मतांनी पराभूत केले होते. काँग्रेसमध्ये प्रवेश करताना शेट्टार म्हणाले होते की, मला सत्तेची भूक नाही. केवळ सन्मान हवा आहे. भाजपने मला तिकीट न देऊन माझा अपमान केला आहे. मी महत्वाकांक्षी व्यक्ती नाही, मला सत्तेची भूक नाही.

शेट्टार कुटुंबाची हुबळी-धारवाड भागात मोठी ताकद आहे. ते शेट्टार हे स्वत: महापौर होते. आमदार, मंत्री, मुख्यमंत्री अशी पदे त्यांनी भूषवली आहे. सध्या त्यांचे बंधू व चुलते आमदार आहेत. लिंगायत समाजातील बडे नेते म्हणून त्यांची ओळख असल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला त्यांचा फायदा होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Jagadish Shettar joins BJP
Bharat Bandh : शेतकऱ्यांनो, शेतात काम करू नका! राकेश टिकैत यांच्याकडून ‘भारत बंद’ची हाक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com