Tamil Nadu Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेत फूट पडली होती. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आपल्या ताब्यात घेतली. सर्वाधिक आमदार, खासदार आपल्याकडे असल्याचा दावा करत निवडणूक आयोगाकडून शिवसेना आपल्या ताब्यात ठेवली. मुळ पक्ष ताब्यात ठेवणाऱ्या एकनाथ शिंदेंचा पॅटर्न तमिळनाडूमध्ये देखील तयार होतो आहे.
तमिळनाडूमध्ये नुकतीच विधानसभेची निवडणूक पार पडली आहे. अभिनेता विजया पक्ष टीव्हीके सत्तेत आला आहे. मात्र, विजयने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. विजयला पाठींबा देण्यावरून एआयएडीएमकेमध्ये फूट पडली आहे. 47 आमदार असलेल्या या पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या पलानस्वामी यांच्या विरोधात मोठी नाराजी आहे.
पलानस्वामी यांच्या विरोधातील नाराज आमदार गटाचे नेतृत्व खासदार व्ही ष्णमुगम करत आहेत. 47 पैकी तब्बल 36 आमदार बंडाच्या तयारी आहेत. या आमदारांची मागणी विजय याला पाठींबा देत सत्तेत सहभागी होण्याची होती. मात्र, पलानस्वामी यांनी त्याला विरोध केला आहे.
पलानस्वामी यांच्या नेतृत्वाखालील एआयएडीएकेच्या 47 आमदारांपैकी 36 आमदार सोबत असल्याने व्ही ष्णमुगम हे पक्षावरच दावा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते तामिळनाडूमधील 'एकनाथ शिंदे' ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदेंप्रमाणे ते पूर्ण पक्षच आपल्या ताब्यात घेणार असल्याची चर्चा आहे.
व्ही ष्णमुगम हे राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांनी विजय यांच्या पाठींब्यासाठी गुरुवारी आपला राजीनामा दिल्याच्या चर्चा होत्या. दरम्यानस तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आमदार म्हणून विजय मिळवला आहे म्हणून आपण राजीनामा दिल्याचे सांगितले आहे. मात्र, त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने पलानस्वामी यांच्यावर त्यांचा विश्वास नसल्याचे सांगितले जाते.
बंडखोर आमदारांकडून पलानस्वामी यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहे. पक्षाचे नेतृत्व करताना ते इतर कोणालाही विचारात घेत नाहीत. स्वतःच्या मर्जीने कारभार करत आहेत. आपल्या स्वःताचा स्वार्थ साधण्यासाठी इतरांचा बळी देत असल्याचे देखील आरोप त्यांच्यावर होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.