Tamilnadu Politics : विजयने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच 36 आमदार बंडाच्या तयारीत; AIADMK उभी फूट?

Vijay swearing ceremony AIADMK Split : तमिळनाडूमध्ये विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही तासातच एआएडीएमके पक्षात फूट पडल्याचे समोर आले आहे.
Political buzz intensifies in Tamil Nadu amid reports of rebellion within AIADMK and possible support to TVK.. (AI Image)
Political buzz intensifies in Tamil Nadu amid reports of rebellion within AIADMK and possible support to TVK. (AI Image)Sarkarnama
Published on
Updated on

AIADMK News : तमिनाडूचे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अभिनेता विजय याने मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या चार तासांमध्ये एआयडीएमके पक्षात फूट पडल्याचे समोर आले आहे. तब्बल 36 आमदार बंडाच्या तयारीत असून विजय यांना पाठींबा देण्याची शक्यता आहे.

एडीएएमके पक्षाला 47 जागा मिळाल्या आहेत. तर, त्यांच्यासोबत असलेल्या मित्र पक्षांना चार जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, एडीएमकेचे नेतृत्व करणाऱ्या पलानीस्वामी याच्यावर आमदारांचा मोठा गट नाराज आहे. या नाराज गटाचे नेतृत्व माजी मंत्री व्ही ष्णमुगम हे करत असल्याचे वृत्त आहे. पलानस्वामी हे एकतर्फी निर्णय घेत असून कोणालाही विश्वात घेत नाही. स्वःच्या हिताचे राजकारण ते करत असल्याचा आरोप बंडखोर आमदारांचा आहे.

निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर बंडखोर आमदारांनी विजय यांना पाठींबा देण्याची भूमिका घेतली होती. मात्र, पलानस्वामी यांनी विरोधात राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फोडाफोडी होऊ नये म्हणून काही आमदारांना रिसाॅर्टमध्ये ठेवण्यात आले आहे.

Political buzz intensifies in Tamil Nadu amid reports of rebellion within AIADMK and possible support to TVK.. (AI Image)
Tamil Nadu politics : तामिळनाडूत 'रिसॉर्ट पॉलिटिक्स', फोडाफोडीच्या धास्तीने आमदारांना राज्याबाहेर नेलं; सत्तासंघर्ष टोकाला! नेमकं काय घडलं?

पक्ष ताब्यात घेणार

बंडखोर आमदारांची संख्या 36 असल्याची माहिती आहे. त्यामुळे व्ही ष्णमुगम हे थेट एडीएमके पक्षावर दावा सांगण्याची शक्यता आहे. पलानस्वामी यांना हटवून एडीएमके व्ही ष्णमुगम ताब्यात घेण्याची शक्यता आहे. तसेच सत्तेतील टीव्हीकेला पाठींबा देण्याची त्यांची मानसिकता आहे. त्यामुळे तामिळनाडूचे राजकारण नव्या वळणावर उभे असल्याची चर्चा आहे.

Political buzz intensifies in Tamil Nadu amid reports of rebellion within AIADMK and possible support to TVK.. (AI Image)
Tamil Nadu Crisis : CM पदाचं समीकरण सोडवणाऱ्या थलपती विजय यांना 10 वीत गणिताने फोडला होता घाम!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com