DA Hike Big Update : सणासुदीच्या काळात देशातील लाखो कामगारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाच्या लेबर ब्युरोने 1 ऑक्टोबर 2026 पासून कृषी, बांधकाम आणि देखभाल क्षेत्रातील कामगारांसाठी Variable Dearness Allowance म्हणजेच VDA मध्ये सुधारणा केली आहे. या बदलामुळे संबंधित कामगारांच्या किमान वेतनात वाढ झाली आहे.
कृषी क्षेत्रातील कामगारांचे वेतन त्यांच्या कौशल्याच्या पातळीबरोबरच Area A, B आणि C नुसार निश्चित करण्यात आले आहे. Area A मधील अकुशल कामगारांसाठी मूळ वेतन 333 आणि VDA 204 असे मिळून एकूण 537 प्रतिदिन वेतन निश्चित करण्यात आले आहे. Area B मध्ये हे वेतन 491, तर Area C मध्ये 486 प्रतिदिन असेल.
अतिशय कुशल कामगारांसाठी Area A मध्ये एकूण 705, Area B मध्ये 655 आणि Area C मध्ये 587 प्रतिदिन वेतन निश्चित करण्यात आले आहे.
रस्ते, रनवे, इमारती, भूमिगत वीज आणि कम्युनिकेशन केबल्स, पाणीपुरवठा आणि सीवर पाइपलाइनसह विविध बांधकाम व देखभाल कामांमध्ये असलेल्या कामगारांसाठीही नवीन VDA दर लागू झाले आहेत.
Area A मधील अकुशल कामगारांना आता 840 प्रतिदिन, तर अतिशय कुशल कामगारांना 1,111 प्रतिदिन मिळतील. Area B मध्ये अकुशल कामगारांसाठी 704 आणि अतिशय कुशल कामगारांसाठी 1,024, तर Area C मध्ये अनुक्रमे 565 आणि 933 प्रतिदिन वेतन निश्चित करण्यात आले आहे.
महागाईमुळे वाढलेल्या जीवनावश्यक खर्चाचा परिणाम कमी करण्यासाठी वेतनामध्ये महागाईशी संबंधित भत्ता दिला जातो. लेबर ब्युरेच्या आदेशानुसार Industrial Workers चा Consumer Price Index 424.80 वरून 431.42 वर पोहोचला. म्हणजेच निर्देशांकात 6.62 अंकांची वाढ झाली. त्यानुसार 1 ऑक्टोबर 2026 पासून सुधारित VDA लागू करण्यात आला आहे.
महत्त्वाचे म्हणजे, ही वाढ सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये झालेली वाढ नसून संबंधित क्षेत्रातील कामगारांच्या किमान वेतन आणि VDA दरांमध्ये करण्यात आलेली सुधारणा आहे. त्यामुळे पात्र कामगारांना ऑक्टोबरपासून वाढीव वेतनाचा थेट फायदा मिळणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.