America Truck Attack Sarkarnama
देश

America Truck Attack : अमेरिकेतील 'ट्रक अ‍ॅटक'मधील मृतांची संख्या 15 वर अन् हल्लेखोराचा थेट 'ISIS'शी संबंध!

Shamsud Din Jabbar : विशेष म्हणजे हल्लेखोर स्वत:च्याच कुटुंबाला संपवू इच्छित होता अन् अमेरिकी सैन्यातून झाला आहे निवृत्त

Mayur Ratnaparkhe

Terrorist Attack in America : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अमेरिका एका भीषण हल्ल्याने हादरली. लुइसियानामधील न्यू ऑरलियन्स मध्ये एका माथेफिरूने भरधाव ट्रक जमावात घुसवला, ज्यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला. या ट्रक हल्ल्यात 35 जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी ट्रक चालवणाऱ्या माथेफिरूला गोळ्या घालून ठार केलं आहे. तर हल्लेखोराची ओळख आता समोर आली असून, तो टेक्सासमध्ये राहणारा 42 वर्षीय अमेरिकी नागरिक शम्सुद्दीन जब्बार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार एफबीआने म्हटले आहे की, वाहनात आयएसआयएस(ISIS)चा झेंडा आढळून आला आहे आणि या हल्ल्याचा तपास दहशतवादी हल्ल्याच्या घटनेप्रमाणेच केला जात आहे. या हल्ल्याचा तपास करणाऱ्यांचे म्हणणे आहे की, संशियीत हल्लेखोराने हल्ल्याच्या काही तास आधी सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड केले होते. ज्यातून हे समजते की तो 'आयएसआयएस'(ISIS)शी प्रेरित होता आणि हत्या करण्याच्या विचारानेच आला होता.

सीएनएन रिपोर्टनुसार तपास अधिकाऱ्यांच्या मते, हल्लेखोराने व्हिडिओत आपल्या कुटुंबाला संपवण्याचीही योजना बनवणे आणि अशी स्वप्न पाहण्याबाबत म्हटले आहे, की ज्यामुळे त्याला आयएसआयएसमध्ये सहभागी होण्याची प्रेरणा मिळाली.

जब्बारने व्हिडिओमध्ये आपल्या तलाकचाही उल्लेख केला आणि सांगितले की, कशाप्रकारे त्याने आपल्या कुटुंबाला मारण्याच्या इराद्याने सर्वांना एका जल्लोषासाठी एकत्र जमवण्याची योजना आखली होती. तपास अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, जब्बारने व्हिडिओत म्हटले की त्याने आपली योजना बदलली आणि मग तो आयएसआयएसमध्ये सहभागी झाला. त्याने आपल्या अनेक स्वप्नांचा उल्लेख केला जी त्याबद्दल होती की त्याने दहशतवादी गटात का सामील झालं पाहिजे.

रिपोर्टनुसार असं वाटतं की, हल्लेखोराने रात्री गाडी चालवताना हे व्हिडिओ रेकॉर्ड केले असावेत, खरंतर नक्की वेळ काय असेल हे समजू शकले नाही. अमेरिकी सेनेच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, जब्बारने एक दशकापेक्षाही अधिक काळापर्यंत सैन्यात काम केले. त्याने मार्च 2007 ते जानेवारी 2015पर्यंत सक्रीय राहून मानव संसाधन विशेषज्ञ आणि माहिती तंत्रज्ञान विशेषज्ञ म्हणून काम केले. तो फेब्रुवारी 2009 ते जानेवारी 2010पर्यंत अफगाणिस्तानात तैनात होता. जानेवारी 2015मध्ये सक्रीय नोकरी सोडल्यानंतर जब्बारने जुलै 2020पर्यंत आर्मी रिझर्व्हमध्ये काम केले, त्यानंतर त्याने स्टाफ सार्जेंट म्हणून नोकरी सोडली.

एफबीआयने(FBI) हेदेखील म्हटले की, वाहन टुरो नावाच्या कार-रेंटल प्लॅटफॉर्मवरून भाड्याने घेतले होते. याशिवाय FBIने आधी म्हटले होते की, त्यांना विश्वास नाही की न्यू ऑरलियन्स हल्ला घडवणारा चालक शम्सुद्दीन जब्बार दहशतवादी कृत्यासाठी पूर्णपणे जबाबदार होता.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT