NIA Raid Against ISIS : मोठी बातमी! 'एनआयए'चे महाराष्ट्रात 40 ठिकाणी छापे; धक्कादायक माहिती समोर

ATS News : आयसिससंबंधित 15 जण ताब्यात
NIA
NIASarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आयसिसच्या (ISIS) दहशदविरोधी कारवायांविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) मोठी मोहीम उघडली आहे. एनआयए आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस)ने संयुक्तिकरित्या शनिवारी सकाळी महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये मोठी कारवाई केली. या कारवाईत 15 संशयितांना ताब्यात घेतले आहे.

पुण्यात आयसीसच्या कारवायाविरोधात केलेल्या छापेमारीनंतर आज एनआयने ही मोठी छापेमारी केली. कर्नाटक आणि महाराष्ट्रात झालेल्या 44 ठिकाणांवरील या कारवाईमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रात तब्बल 41 ठिकाणी पाचशे पोलिसांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली आहे.

NIA
Maratha Reservation : अंतरावली सराटीतील आंदोलकांवरील गुन्हे मागे नाही; काय सांगतो क्लोजर रिपोर्ट ?

या कारवाईत कर्नाटकातील एक, पुण्यात दोन, ठाणे शहरात नऊ, भाईंदरमध्ये एक आणि ठाणे ग्रामीणमध्ये 31 आदी ठिकाणांचा समावेश आहे. या कारवाईत एनआयएने एसीएसच्या मदतीने १५ जणांना तब्यात घेतले. यात पडघा गावातील काही जणांचा समावेश आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या कारवाईतून ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे लोक देशभरात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या तयारीत होते. त्यांच्याकडून बॉम्बस्फोटाचे साहित्य जप्त करण्यात आलेले आहे. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर आणखी दहशतवादी हाताला लागण्याची शक्यता आहे. तसेच त्यांचे काय नियोजन होते याबाबतही माहिती समोर येणार आहे.

पडघा गाव रडारवर

भिवंडीच्या पडघा गावात एनआयएने धाडसत्र सुरू केले आहे. या कारवाईत एटीएसच्या मदतीने एनआयएने ७ ते ८ लोकांना घेतले ताब्यात आहे. पुण्यात सापडलेल्या दहशतवादी प्रकरणानंतर पडघा गावातून दोन ते तीन जणांना अटक केली होती. त्यानंतर हे गाव एटीएसच्या रडारवर आले होते. आता आणखी काही लोकाना अटक होण्याची शक्यता आहे.

(Edited by Sunil Dhumal)

NIA
Sachin Kalyanshetti : अक्कलकोटचा दीड वर्षांचा 'खड्डा' झटक्यात भरला; 45 कोटींचा निधी मंजूर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com