Former IAS officer Debashish Sharma has been named the BJP candidate for the Nagaon Lok Sabha bypoll after joining the party days after his voluntary retirement. Sarkarnama
देश

Nagaon Lok Sabha Bypoll : वादग्रस्त अधिकाऱ्याच्या स्वेच्छानिवृत्तीला 3 सप्टेंबरला मंजुरी, 5 दिवसांत भाजपमध्ये प्रवेश अन् आज लोकसभेची उमेदवारी जाहीर

Former IAS officer Debashish Sarma Joins BJP : वादग्रस्त माजी IAS देवाशीष शर्मा यांचा स्वेच्छानिवृत्तीनंतर अवघ्या काही दिवसांत भाजप प्रवेश, नागांव पोटनिवडणुकीत उमेदवारी जाहीर होताच पक्षाच्या टायमिंगची चर्चा.

Rajanand More

BJP candidate update : भाजपने आसाममधील नागांवर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराची घोषणा केली आहे. माजी IAS अधिकारी देवाशीष शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांना उमेदवारी जाहीर होताच आता भाजपच्या टायमिंगची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे उमेदवारी जाहीर होण्याआधीच काँग्रेसने शर्मा यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

भाजपचे आमदार प्रद्युत बोरदोलाई यांनी आसाम विधानसभा निवडणुकीआधी खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. ते २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर विजयी झाले होते. खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता भाजपने नागांवचे माजी जिल्हाधिकारी शर्मा यांना या मतदारसंघातून मैदानात उतरविले आहे.

अशी आहे क्रोनोलॉजी

शर्मा यांनी काही महिन्यांपूर्वीच स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला होता. त्याचवेळी त्यांना नागांवरमधून उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा होती. त्यांच्या अर्जावर ३ सप्टेंबरला शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून 7 सप्टेंबरला पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली. दुसऱ्याच दिवशी म्हणजे ८ सप्टेंबरला त्यांचा भाजप प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला.

शर्मा यांच्या पक्षप्रवेशाला ७२ तास उलटण्याआधीच भाजपने त्यांना उमेदवारीही जाहीर केली. त्यामुळे शर्मा यांचा स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय उमेदवारीसाठीच होता का, याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, काँग्रेसने शर्मा यांच्याविरोधात यापूर्वीच प्रशासकीय अनियमिततेबाबत आयोगाकडे तक्रार केली आहे.

निवडणूक अधिकारी म्हणून अनियमितता?

काँग्रेसचे खासदार रकीबुल हुसैन यांनी शर्मा यांच्याविरोधात करण्यात आलेल्या तक्रारींच्या चौकशीची मागणी केली आहे. प्रकरणांची चौकशी होईपर्यंत त्यांना जबाबदारीतून मुक्त करू नये, असे तक्रारीत म्हटले आहे. तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून त्यांनी निवडणुकांसंदर्भात घेतलेले निर्णय, आदेश आणि कारवाईची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. त्यामुळे आता शर्मा यांच्या उमेदवारीवरून वादाची ठिणगी पडली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT